शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Flood: आधीच बुडालेल्या पाकिस्तानवर वॉटर बॉम्बचा धोका; नासाने जारी केले धक्कादायक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 12:56 IST

Pakistan Flood Nasa Warning: पाकिस्तानमध्ये जवळपास साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले आहेत. असे असताना नासाने एक मोठा धोका दाखवून दिला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या अती मुसळधार पावसामुळे निम्मा पाकिस्तान पुराच्या पाण्याखाली बुडाला आहे. महागाईच्या गर्तेत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारतापुढे हात कसे पसरायचे या विवंचनेत तेथील राज्यकर्ते असताना पाकिस्तानवर आता एका मोठ्या वॉटर बॉम्बचे संकट घोंघाऊ लागले आहे. 

पाकिस्तानमध्ये जवळपास साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले आहेत. असे असताना नासाने एक मोठा धोका दाखवून दिला आहे. यामुळे सुमारे लाखभर लोकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा मंछर तलावावरील बांध फुटण्याच्या अवस्थेत आहे. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू मातीपासून तुटल्या आहेत. यामुळे जर हा बंधारा फुटला तर लाखो लोकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. 

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १३०० लोकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाच्या लँडसेट ८ आणि ९ या दोन सॅटेलाईटनी या मंछर लेकचे फोटो काढले आहेत. हा तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरून वाहू लागला आहे. या तलावाचे बंधारे कोनातून फुटले आहेत. सिंधू नदीच्या पठारावर दाटीवाटीने लोकवस्ती आहे. हा तलाव फुटला तर या लोकवस्तीत पाणी घुसणार आहे. या लोकवस्तीत तलावाचे पाणी जाण्यापासून वाचविण्यासाठी हे बंधारे बांधण्यात आले होते, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. नासाने २८ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबरचे फोटो जारी केले आहेत. खोऱ्यात पसरलेल्या शेकडो गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे 100,000 लोकांना पुराचा धोका आहे. पाकिस्तानात आलेला पूर हा गेल्या १० वर्षांतील मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. मृतांचा आकडा आणि हजारो जखमींची संख्या सातत्याने वाढत आहे. 10 लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे होणारे आर्थिक नुकसान 15 अब्ज डॉलर्स ते 20 अब्ज डॉलर्स एवढे असू शकते.

या प्रदेशात या वर्षी आतापर्यंत सरासरी वार्षिक पावसाच्या पाचपट जास्त पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता ब्रिटनच्या हवामान खात्याने वर्तवली आहे, असे नासाने म्हटले आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सरकारने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. अन्न, पाणी, आरोग्य उपकरणे आणि मदतीसाठी आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी पाकिस्तानमधील पुरामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी 160 दशलक्ष डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :NASAनासाPakistanपाकिस्तानfloodपूर