Donald Trump: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते इराणशी चर्चा करण्याची योजना आखत आहेत. सध्या खूप मोठी आणि खूप शक्तिशाली जहाजे इराणच्या दिशेने जात आहेत आणि जर त्यांचा वापर करावा लागला नसता तर चांगले झाले असते.
इराणचे अधिकारी अमेरिकेशी संभाव्य लष्करी संघर्षाची तयारी करत असताना, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, एक नवीन अमेरिकन नौदलाची युद्धनौका मध्य पूर्वेत दाखल झाली आहे, अशा वेळी ट्रम्प यांचे हे विधान आले असून, ते महत्त्वाचे मानले जात आहे. गेल्या ४८ तासांत यूएसएस डेल्बर्ट डी. ब्लॅक या भागात पोहोचले. ज्यामुळे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या युद्धनौकांची एकूण संख्या सहा झाली आहे. एक विमानवाहू जहाज आणि इतर तीन समुद्री युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला १ हजार नवीन ड्रोन मिळाले आहेत. अमेरिकेच्या अटींनुसार कोणताही करार करणे हे युद्धापेक्षा महागडे आणि धोकादायक ठरेल, असे तेहरानला वाटत असल्याने इराण लष्करी संघर्षाची तयारी करत आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. इराणी सैन्याला मिळालेले ड्रोन धोक्यांना ओळखून त्यांना तोंड देण्यासाठी डिझाइन केले आहेत. यामध्ये विविध श्रेणींचे ड्रोन आहेत. ज्यामध्ये फायटर, स्ट्राइक, सर्व्हिलन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ड्रोन यांचा समावेश आहे, जे जमीन, समुद्र आणि हवेत स्थिर आणि हालचाल करणारे लक्ष्य नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
Web Summary : Amid rising tensions, Trump proposes talks with Iran while deploying warships. Iran prepares for potential conflict, acquiring new drones. US naval presence in the Middle East has increased with additional warships.
Web Summary : बढ़ते तनाव के बीच, ट्रंप ने ईरान के साथ वार्ता का प्रस्ताव रखा और युद्धपोत तैनात किए। ईरान संभावित संघर्ष की तैयारी कर रहा है, नए ड्रोन खरीदे। मध्य पूर्व में अमेरिकी नौसेना की उपस्थिति बढ़ी।