शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 06:00 IST

इराणने बदला घेण्याची केली घोषणा; इस्रायल म्हणतो आम्हीही तयार आहोत

जेरुसलेम : सीरियातील आपल्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणइस्रायलवर हल्ला करून बदला घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी इराणने क्षेपणास्त्र तयार ठेवली आहेत. जर इराणने हल्ला केलाच तर  कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी देश तयार आहे, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. यामुळे जगात आणखी एका युद्धाला तोंड फुटते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे ‘डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ’ मोहम्मद जमशिदी यांनी अमेरिकेला म्हटले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या जाळ्यात अडकू नका. जर या हल्ल्यात तुमचे नुकसान होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया या प्रकरणापासून दूर राहा, असे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या इशाऱ्यामुळे अमेरिकन सैन्य हाय अलर्टवर आहे.

नेमके काय झाले होते? १ एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासजवळ हवाई हल्ला केला होता. यामध्ये इराणच्या दोन लष्करी कमांडरसह १३ जण मारले गेले. यानंतर इराणने इस्रायलला बदला घेण्याची धमकी दिली आहे. 

सैनिकांच्या सुट्ट्याही रद्दइस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट म्हणाले की, इराणने बदला घेण्याची धमकी दिली आहे. मात्र, आम्ही तयार आहोत. त्यांनी बैठक घेत युद्धसज्जतेचा आढावा घेतला. यासाठी सैनिकांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

...तर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्ध पसरेलnइराण आणि इस्रायलमधील शत्रूत्व जगजाहीर आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांना थेट भिडण्याची हिंमत कधीच दाखवली नाही. इराणने हमासला नेहमीच पाठिंबा दिला. nइस्रायल इराणी ठिकाणांवर हल्ले करतो. आता इराणने थेट इस्रायलला लक्ष्य केले तर सर्वात मोठा धोका म्हणजे हे युद्ध संपूर्ण मध्यपूर्वेत पसरेल आणि त्याचे परिणाम घातक होतील.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल