Roberto Cazzaniga Dating: मायाने चुना लावला! ज्या मॉडेलच्या प्रेमात व्हॉलिबॉल प्लेअरने उधळले 6 कोटी ती निघाली म्हातारी महिला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 19:40 IST2021-11-29T19:37:37+5:302021-11-29T19:40:46+5:30
Roberto Cazzaniga Dating model Alessandra Ambrosio: इटलीचा व्हॉलिबॉलपटू रॉबर्टो कैज़ानिगा याचे वय 42 वर्षे आहे. तो कथितरित्या 2008 पासून मॉडेल एलेसेंड्रा एम्ब्रोसियोला डेट करत होता.

Roberto Cazzaniga Dating: मायाने चुना लावला! ज्या मॉडेलच्या प्रेमात व्हॉलिबॉल प्लेअरने उधळले 6 कोटी ती निघाली म्हातारी महिला...
एका व्यावसायिक व्हॉलिबॉल पटूसोबत मोठा धोका झाला आहे. तो एका ब्राझिलियन मॉडेलला व्हर्च्युअली डेट करत होता. गेल्या काही वर्षांत त्याने तिच्यावर एक दोन लाख नाही तब्बल 6 कोटी रुपये उधळले होते. मात्र, जेव्हा त्याला ती मॉडेल नसून म्हतारी महिला असल्याचे समजले तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ती महिला 50 वर्षांची निघाली.
इटलीचा व्हॉलिबॉलपटू रॉबर्टो कैज़ानिगा याचे वय 42 वर्षे आहे. तो कथितरित्या 2008 पासून मॉडेल एलेसेंड्रा एम्ब्रोसियोला डेट करत होता. रॉबर्टो तिला कधीही भेटला नाही. डिजिटलीच त्यांचे बोलणे, हसणे आदी सुरु होते. त्याला वाटत राहिले की तो मॉडेल एलेसेंड्रालाच डेट करत आहे. खरेतर एलेसेंड्रा मॉडेल रॉबर्ट ली ला डेट करत आहे. त्याच्यासोबत ती सध्या हवाईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
तर व्हॉलिबॉलपटू रॉबर्टोनुसार 2008 मध्ये त्याला एका मित्राने त्याला एक मोबाईल नंबर दिला होता. तो कथितरित्या माया नावाच्या महिलेचा होता, ती त्याला भेटण्यास इच्छुक होती. यानंतर लवकरच त्या दोघांनी एकमेकांशी बोलणे सुरु केले. यावेळी महिलेने दावा केला की ती माया नसून मॉडेल एलेसेंड्रा आहे. तिचा आवाज ऐकून रॉबर्टोदेखील भुलला व तिच्याशी बोलू लागला. हा फसवणुकीचा प्रकार रॉबर्टोने इटलीच्या प्रसारमाध्यमांना सांगितला आहे.
या महिलेने काही ना काही गरज असल्याचे सांगून त्याकडून 6 कोटी रुपये उकळले. रॉबर्टो देखील वेड्यासारखा तिच्या खात्यात पैसे टाकू लागला. जेव्हा जेव्हा रॉबर्टोने तिला भेटण्याची गळ घातली तेव्हा तेव्हा तिने आजारी असण्याचा किंवा कामाची हजारो कारणे सांगून भेट टाळली. मात्र, तिच्या आवाजाशी मला प्रेम झाले आणि रोज बोलू लागल्याचे तो म्हणाला.
जेव्हा त्याला समजले की ती मॉडेल एलेसेंड्रा एम्ब्रोसियो नसून दुसरीच महिला आहे, तेव्हा त्याचे डोळे उघडले. रॉबर्टोला चुना लावण्याच्या कटात त्याची एक मैत्रिण मैनुएला देखील होती. त्याच महिलेने त्याला 13 वर्षांपूर्वी तिचा नंबर दिलेला. त्या महिलेचे नाव वेलेरिया होते, तिने एवढी वर्षे रॉबर्टोला एलेसेंड्रा असल्याचे भासविले आणि पैसे उकळवत राहिली.