ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:08 AM2024-04-19T05:08:21+5:302024-04-19T05:09:43+5:30

२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत.

Volcanic Eruption, Tsunami Warning 11,000 citizens ordered to leave their homes | ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

जकार्ता : हजारो फूट उंचीवरील रुआंग पर्वतावरील ज्वालामुखीचे गेल्या २४ तासांत पाच मोठे उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र राख, दगड, लाव्हारस पसरला आहे. त्यामुळे प्रशासनाने ११,००० हून अधिक लोकांना परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

सुलावेसी बेटाच्या उत्तरेकडील ज्वालामुखीमध्ये गेल्या २४ तासांत किमान पाच मोठे उद्रेक झाल्याचे इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्ती निवारण केंद्राने सांगितले. बुधवारी आधी किमान ८०० रहिवाशांनी परिसर सोडला होता. त्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे. 

१२० सक्रिय ज्वालामुखी
२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळू शकतो आणि तेथे १८७१ च्या उद्रेकाप्रमाणे त्सुनामी येऊ शकते. टॅगुलंडांग बेट पुन्हा धोक्यात आले आहे. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.  

२०१८ मध्ये झाला होता ४३० लोकांचा मृत्यू
- इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, रहिवाशांना सुलावेसी बेटावरील मॅनाडो या जवळच्या शहरामध्ये स्थलांतरित 
केले जाईल. 
- २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या अनाक क्रकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर त्सुनामी आली. त्यात ४३० लोकांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Volcanic Eruption, Tsunami Warning 11,000 citizens ordered to leave their homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.