Vladimir Putin : रशियन परराष्ट्रमंत्र्यानं केलं होतं असं वक्तव्य, पुतिन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडे मागावी लागली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:29 IST2022-05-06T10:26:49+5:302022-05-06T10:29:25+5:30
यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही राष्ट्रपती पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले.

Vladimir Putin : रशियन परराष्ट्रमंत्र्यानं केलं होतं असं वक्तव्य, पुतिन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडे मागावी लागली माफी
रशियाचे राष्ट्रपती (Russia) व्लादिमीर पुतिन यांना आपले परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह (Sergey Lavrov) यांच्या एका वक्तव्यामुळे इस्रायलची माफी मागावी लागली आहे. जर्मनी (Germany) चा हुकूमशाह अॅडोल्फ हिटलर (Hitler) हा यहुदी (Jewish) वंशाचा असल्याचे लाव्हरोव्ह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रशियन राजदूताला बोलावून माफी मांगण्यास सांगण्यात आले होते.
पुतिन यांनी व्यक्त केला खेद -
इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी ट्विट करत म्हटले आहे, की त्यांनी गुरुवारी राष्ट्रपती पुतीन यांना मारिपोल येथील स्टील कारखान्यातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात विनंती करण्यासाठी फोन केला होता. यावेळी, पुतिन यांनी कारखान्यातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मार्ग देण्यास सहमती दर्शवली. याच वेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हणत, खेद व्यक्त केला.
पुतीन यांनी इस्रायलला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा -
यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही राष्ट्रपती पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले.
काय म्हणाले होते लाव्हरोव्ह? -
लाव्हरोव्ह म्हणाले होते, हिटलरकडे युक्रेनमध्ये मॉस्कोच्या ऑपरेशनची व्याख्या करण्यासाठी यहुदी वारसा होता. यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत तणाव दिसून आला. मात्र, असे असले तरी रशिया आणि युक्रेनचे संबंध अत्यंत चांगले आहेत.