ना स्मार्टफोन, ना इंटरनेट; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा स्मार्टनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 16:47 IST2018-02-09T16:43:57+5:302018-02-09T16:47:08+5:30
पुतिन हे या सगळ्याला अपवाद ठरणारे आहेत.

ना स्मार्टफोन, ना इंटरनेट; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा स्मार्टनेस
मॉस्को: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट या गोष्टी म्हणजे मुलभूत गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातही या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत.
मग एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हटला तर त्याने टेक्नोसॅव्ही असावे, अशी लोकांची साहजिक अपेक्षा असते. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या सगळ्याला अपवाद ठरणारे आहेत. व्लादिमीर पुतिन हे अजूनही स्मार्टफोन वापरत नाहीत. तसेच ते इंटरनेटचा वापरही करत नाहीत. काही दिवसांपूर्वी रशियात शास्त्रज्ञ आणि विद्वानांच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दलचा खुलासा केला. याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांकडे स्मार्टफोन असेल, पण माझ्याकडे नाहीये, असे पुतिन यांनी सांगितले. एवढेच काय पुतिन 2005 पर्यंत साधा मोबाईलही वापरत नव्हते.
गेल्यावर्षी एका शाळेच्या कार्यक्रमात पुतिन यांनी आपण खूपच कमीवेळा इंटरनेट वापरत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.