पुतिन यांची 'बॉन्ड गर्ल' म्हणून ओळखली जाते ही सुंदर, रशियासाठी करते खास काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:52 IST2022-03-04T16:38:03+5:302022-03-04T16:52:45+5:30
Rossiyana ला लोक रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची बॉन्ड गर्ल म्हणतात. तिने जगासमोर अनेकदा रशियाची बाजू मांडली आहे.

पुतिन यांची 'बॉन्ड गर्ल' म्हणून ओळखली जाते ही सुंदर, रशियासाठी करते खास काम
यूक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान सध्या सोशल मीडियावर सध्या एका महिलेची फारच चर्चा होत आहे. या महिलेचं नाव आहे Rossiyana Markovskaya. Rossiyana ला लोक रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची बॉन्ड गर्ल म्हणतात. तिने जगासमोर अनेकदा रशियाची बाजू मांडली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, Rossiyana Markovskaya ला २०१७ मध्ये रशियाचे सुरक्षा मंत्री सर्गेई शोइगु यांची राजकीय प्रवक्ता बनवण्यात आलं होतं. तेव्हापासून ती रशिया सरकारसाठी काम करत आहे.
असं सांगितलं जात आहे की, जेव्हापासून Rossiyana Markovskaya ने पद सांभाळलं आहे तिने पडद्यामागे राहून रशियासाठी काम केलं आहे. यावर्षीच जानेवारीमध्ये म्यांमार गेली होती आणि सेनेच्या सहयोगाबाबत चर्चा केली होती. पण तेव्हापासून Rossiyana Markovskaya कुठे दिसली नाही.
दरम्यान रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगुची प्रवक्ता बनण्याआधी Rossiyana Markovskaya एका नॅशनल न्यूज चॅनलवर रिपोर्टर आणि अॅंकर म्हणून काम करत होती.
पण अजून या गोष्टीचा खुलासा झाला नाही की, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांची यूक्रेनच्या हल्ल्यावर काय भूमिका आहे. पण असं मानलं जात आहे की, Rossiyana Markovskaya लवकरच प्रेन्स कॉन्फरन्स घेऊन याची माहिती देणार आहे.