खतरनाक! कॅमेरात कैद झाला अंतराळातील सर्वात मोठा स्फोट, व्हायरल झाला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:17 IST2021-06-04T15:14:59+5:302021-06-04T15:17:06+5:30

वैज्ञानिकांनी सांगितलं की, ताऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर या ताऱ्याची ब्लॅक होलमध्ये परिवर्तीत होणारी प्रोसेस कॅमेरात कैद करण्यात आली आहे.

VIDEO : Universe biggest explosion got captured in the camera and it is going viral | खतरनाक! कॅमेरात कैद झाला अंतराळातील सर्वात मोठा स्फोट, व्हायरल झाला VIDEO

खतरनाक! कॅमेरात कैद झाला अंतराळातील सर्वात मोठा स्फोट, व्हायरल झाला VIDEO

पृथ्वीपासून एक अब्ज प्रकाश वर्ष दूर झालेला एक विशाल गामा-रे स्फोट कॅमेरात कैद झाला आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, अंतराळात झालेला हा स्फोट सर्वात मोठा स्फोट आहे. जर्मनीच्या हॅम्बर्गच्या इलेक्ट्रॉन सिंक्रोट्रोनच्या वैज्ञानिकांनुसार, स्फोटाची ही घटना एका ताऱ्याच्या मृत्यूनंतर घडली आहे.

वैज्ञानिकांनी सांगितलं की, ताऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर या ताऱ्याची ब्लॅक होलमध्ये परिवर्तीत होणारी प्रोसेस कॅमेरात कैद करण्यात आली आहे. या घटनेला स्पेसमध्ये असलेल्या फर्मी आणि स्विफ्ट टेलीस्कोपने डिटेक्ट केलं आहे. त्यासोबतच नामीबियामधील हाय एनर्जी स्टीरिओस्कोपिक सिस्टीम टेलीस्कोपनेही हा व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी मदत केली आहे. (हे पण बघा : अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत, या फोटोसाठी आपण अंतराळवीरांचे आभार मानले पाहिजे!)

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एचईएसएस समूहातील १५ देशांच्या ४१ संस्था आणि २३० वैज्ञानिकांचा समावेश आहे. या देशांमध्ये नामीबिया, साउथ आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, यूके, आयरलॅंड, इटली, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, पोलॅंड, स्वीडन, अरमेनिया, जपान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

या घटनेबाबत सायन्स जर्नलमध्ये पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. या रिसर्चचे लेखक वैज्ञानिक सिल्विया ज्हू म्हणाले की, तारा वेगाने फिरत होता आणि तो नष्ट होताच ब्रम्हांडातील सर्वात मोठा स्फोट कॅप्चर करण्यात आम्हाला यश आलं. तेच याप्रकरणी एचईईएसचे प्रवक्ता स्टीफन वागनर म्हणाले की, गामा-रे च्या स्फोटाची पूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी नेक्स्ट जनरेशन उपकरण चांगलं काम करत आहेत. यात सर्वात जास्त चर्चा चिलीच्या चेरेनकोव टेलीस्कोपची आहे.
 

Web Title: VIDEO : Universe biggest explosion got captured in the camera and it is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.