शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 19:06 IST

Sushant Singh Rajput Suicide : थांबा, सुशांत आजही 'जिवंत' आहे. होय आत्म्यांशी बोलणारे प्रसिद्ध अतिंद्रीय शक्ती तज्ज्ञ स्टीव्ह हफ्फ यांनी हा दावा केला आहे. सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा त्यांनी केला आहे. नुसता दावाच नाही त्यांनी याचा व्हिडीओही बनविला आहे.

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला महिना उलटला आहे. त्याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्याच्या प्रेयसीसह अनेकांनी केली आहे. त्याच्या मृत्यूने त्याचे फॅन्स, कुटुंबीय, मित्र साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रत्येकजण त्याच्या परतण्याकडे भाबडी आशा ठेवून आहे. पण आता ते केवळ अशक्य आहे. कारण बॉलिवूडचा उभरता तारा कायमचा निखळला आहे. 

थांबा, सुशांत आजही 'जिवंत' आहे. होय आत्म्यांशी बोलणारे प्रसिद्ध अतिंद्रीय शक्ती तज्ज्ञ स्टीव्ह हफ्फ यांनी हा दावा केला आहे. सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा त्यांनी केला आहे. नुसता दावाच नाही त्यांनी याचा व्हिडीओही बनविला आहे. या व्हिडीओमध्ये स्टीव्ह यांनी सुशांतच्या चाहत्यांनीच मोठ्या प्रमाणावर आपल्याला गळ घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मेसेज, ईमेलद्वारे या चाहत्यांनी केल्याचे स्टीव्ह म्हणतात. 

13 जुलै रोजी स्टीव्ह यांनी सुशांतच्या आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षांपूर्वी त्यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. या वेळी त्यांनी सुशांतचा आत्मा बोलण्यासाठी येतो का हे देखील पाहिले. सुशांतशी बोलताना त्यांना एका महिलेचाही आवाज आला. यावर त्यांनी सुशांत एकटा नाहीय, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा स्टीव्ह यांनी केला. या साऱ्या प्रयोगाचा त्यांनी युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच त्याचे आभारही मानले आहेत. 

याचबरोबर त्यांनी मी आणखी एकदा सुशांतशी बोलण्याचा प्रयत्न करेन. त्याला आणखी काही प्रश्न विचारेन असे आश्वासन स्टीव्ह यांनी त्याच्या चाहत्यांना दिले आहे. महिलेचा आवाज आल्यावर बोलणे थांबल्याचे ते म्हणत आहेत. 

काय बोलला सुशांत?स्टीव्ह यांनी सुशांतला तुझा मृत्यू कसा झाला असा प्रश्न विचारला. यावर त्या मशीनमध्ये आवाज येतो, '' इथे मला प्रकाश मिळाला आहे हफ, त्यांना सांग मला प्रकाश मिळालाय. आता हा प्रकाश कमी होत चालला आहे. ते तुला पाहत आहे. मी खरेच देवाला भेटू इच्छित होतो. तुम्हाला माहिती आहे का, मी त्यांना काय सांगू इच्छित आहे. माझा आत्मा ठीक आहे आणि तो स्वर्गात आहे. यावर स्टीव्ह यांनी सुशांतला तू जीव का दिलास? असा प्रश्न विचारला तेव्हा पलिकडून आवाज आला की, ''बदला साठी''. यावेळी आणखी काही  आवाज आले. यामध्ये एक पुरुष आणि महिला असल्याचे स्टीव्ह यांनी म्हटले आहे. 

स्टीव्ह यांच्यानुसार ते १० वर्षांपासून आत्म्यांशी बोलतात. यासाठी त्यांनी एक यंत्र बनविले आहे. याद्वारे त्यांना आत्म्याचा आवाज ऐकू येतो. स्टीव्ह यांनी पॅट्रिक स्वेज, मायकल जॅक्सनच्या आत्म्यांशीही अशाप्रकारे बोलले आहेत. 

याआधीही सुशांतच्या आत्म्याशी बोलणे...सुशांतच्या मृत्यूसंदर्भात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जातोय. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ  इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तिने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली. आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत बोललो. यावेळी सुशांतने स्वत: त्याची हत्या झाल्याचे सांगितल्याचा दावा या व्हिडीओतील एक्स्पर्ट करत आहेत. एक्स्पर्ट म्हणतात, सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. पण सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, एवढे मात्र आम्ही सांगू शकतो. आम्ही लवकरच सत्य आणून काढून सुशांत व त्याच्या चाहत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.  आता या दाव्यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत, हेच यातून दिसतेय.

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

Sarkari Nokari : लेखी परीक्षेचे टेन्शन नाही! फक्त मुलाखतीवर बँकेसह या विभागांत सरकारी नोकऱ्यांची संधी

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग