Video: चीन मोठा गेम खेळला! सर्वात छोटी सीक्रेट पाणबुडी लाँच केली, भलेभले तज्ज्ञही गांगरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:21 PM2022-02-09T22:21:23+5:302022-02-09T22:21:36+5:30

China's secret submarine: पाणबुडीचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिच्या चाचणीवेळी हा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारची पाणबुडी २०१८ मध्ये अंतराळातून दिसली होती. 

Video: China Launched the smallest secret submarine; new weapon which far from understand | Video: चीन मोठा गेम खेळला! सर्वात छोटी सीक्रेट पाणबुडी लाँच केली, भलेभले तज्ज्ञही गांगरले

Video: चीन मोठा गेम खेळला! सर्वात छोटी सीक्रेट पाणबुडी लाँच केली, भलेभले तज्ज्ञही गांगरले

Next

जगासाठी नवखी असलेली पाणबुडी चीनने लाँच केली. या पाणबुडीचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिच्या चाचणीवेळी हा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारची पाणबुडी २०१८ मध्ये अंतराळातून दिसली होती. 

व्हिडिओमध्ये दिसणारी पाणबुडी टाइप 039 युआन श्रेणीपेक्षा खूपच लहान आहे. अशा स्थितीत ही पाणबुडी शत्रूच्या हद्दीत खोलवर जाऊन हल्ला करण्यासाठी किंवा टेहळणी मोहिमेसाठी पाठवली जाऊ शकते. अशी रचना असलेली पाणबुडी यापूर्वी कधीही पाहिली नसल्याचा दावाही अनेक तज्ज्ञांनी केला आहे. त्यांचा दावा आहे की चीन आपल्या पाणबुडी तयार करण्याच्या कार्यक्रमात वेगाने प्रगती करत आहे, जो भारत, अमेरिका, जपानसह जगातील अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो.

पाणबुडी तज्ज्ञ एचआय सटन यांचा अंदाज आहे की चीनची नवीन पाणबुडी सुमारे 160 फूट लांब आहे, तर टाइप 039A ची लांबी 250 फुटांपेक्षा जास्त आहे. 2018 मध्ये अशीच एक पाणबुडी सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसली होती. त्यानंतर छायाचित्रांच्या आधारे तज्ज्ञांनी त्याची लांबी सुमारे 150 फूट असल्याचा अंदाज वर्तवला होता. सटन यांच्या अंदाजानुसार नवीन पाणबुडी एकल सिंगल हल असण्याची शक्यता आहे, तर टाइप 039 मध्ये दुहेरी हल आहे. पाणबुडी चार टॉर्पेडो ट्यूबने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.

या नवीन चिनी पाणबुडीबद्दल फारच कमी माहिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांनी दावा केला की हा नवीन व्हिडिओ पुष्टी करतो की बीजिंग लहान पारंपारिक पाणबुड्या तसेच मोठ्या आण्विक-शक्तीच्या पाणबुड्यांच्या डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या नव्या पाणबुडीला पाश्चात्य देशांनी अनौपचारिकपणे टाइप 039C असे नाव दिले. इतर पाणबुड्यांच्या तुलनेत ही चिनी पाणबुडी अधिक स्टेल्थ वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. त्याची सोनार आणि दळणवळण यंत्रणा बरीच प्रगत आहे.

Web Title: Video: China Launched the smallest secret submarine; new weapon which far from understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन