Video - लिव्हरपूलमधील फुटबॉल व्हिक्टरी परेडमध्ये घुसली कार; लोकांना चिरडलं, ५० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:07 IST2025-05-27T09:05:53+5:302025-05-27T09:07:33+5:30
प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांना कारने चिरडलं. ही कार अचानक हजारो लोकांच्या गर्दीत घुसली. यामध्ये जवळपास ५० लोक जखमी झाले.

Video - लिव्हरपूलमधील फुटबॉल व्हिक्टरी परेडमध्ये घुसली कार; लोकांना चिरडलं, ५० जण जखमी
ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरात एका अनियंत्रित कारचा कहर पाहायला मिळाला. प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांना कारने चिरडलं. ही कार अचानक हजारो लोकांच्या गर्दीत घुसली. यामध्ये जवळपास ५० लोक जखमी झाले. यापैकी २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २० जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. यामध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे.
या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला ५३ वर्षीय व्यक्ती लिव्हरपूल परिसरातील रहिवासी आहे. मर्सीसाइड पोलिसांच्या प्रवक्त्याने एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिली. जखमींमधील एका लहान मुलाची आणि एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
Quite the ‘Road traffic collision’ in Liverpool,
— Steve 🇬🇧🏴🏴 (@LordCLQTR) May 26, 2025
Whatever the cause, questions need to be asked why security cordons were lifted early, but the response from cops on the ground seems swift!
pic.twitter.com/D5XEgwO3vs
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला घेऊन जाणाऱ्या संघाच्या ओपन-टॉप कोचने शहराच्या मध्यभागी व्हिक्टरी परेड काढली तेव्हा कारने अनेक लोकांना धडक दिली आणि चिरडलं असं मर्सीसाइड पोलिसांनी सांगितलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये फुटबॉल चाहत्यांच्या गर्दीकडे वेगाने जाणारी एक कार दिसत आहे आणि काही क्षणातच अनेक लोकांना कारने चिरडलं. वृत्तानुसार, या परेडमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ही घटना भयानक असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे.