Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:43 AM2021-06-12T10:43:57+5:302021-06-12T10:47:35+5:30

G7 summit 2021: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भयावह फैलावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर अ‍ॅक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे.

Vaccine: Now the vaccine will be ready in just 100 days, G7 countries will make a big announcement | Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

Next

लंडन - ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या जी-७ देशांच्या बैठकीमध्ये आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भयावह फैलावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर अॅक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे.  (G7 summit 2021) या घोषणेचे प्रमुख उद्देश भविष्यात अशी कुठली साथ आल्यास त्या साथीवरील लस विकसित करण्यासाठीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा कमी करणे हा आहे. कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यानंतर जगाला या आजारावरील पहिली लस मिळवण्यासाठी सुमारे १० महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागली होती. (Now the vaccine will be ready in just 100 days, G7 countries will make a big announcement)

मिळालेल्या माहितीनुसार जी-७ देश शनिवारी एक विशेष अधिवेशनानंतर कार्बिस बे डिक्लरेशन जारी करणार आहेत. त्यामधून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या जीवित आणि वित्तहानीची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक योजना तयार केली जाईल. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार जागतिक पातळीवर या साथीची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ३८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

कार्बिस बे डिक्लरेशनमध्ये भविष्यात येणाऱ्या साथींच्या आजारांना रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याबाबतचे सर्व उपाय असतील. त्यामध्ये भविष्यात कुठल्याही आजारावरील लस, उपचार आणि निदानपद्धती विकसित करण्याची आणि त्याला परवाना देण्याची वेळ १०० हून कमी दिवसांत करण्याचा समावेश असेल. याशिवाय ग्लोबल सर्व्हिलान्स नेटवर्क आणि जीनोम सिक्वेंसिंगची क्षमता वाढवण्याचाही समावेश असेल. हे सर्व देश जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा आणि तिला भक्कम बनवण्याबाबतचा प्रस्ताव मांडतील. 

दरम्यान, शुक्रवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जागतिक असमानतेला रोखण्याच्या प्रस्तावासह या जी-७ शिखर बैठकीची शुरुवात केली. त्यांनी उदघाटनाचे भाषण करताना जगाने २००८ च्या आर्थिक संकटादरम्यान झालेल्या चुकांमधून शिकण्याची आणि असमानचेच्या खाणाखुणा मिटवण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, शुक्रवारी जी-७ देशांमधील सर्व नेते ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ-२ यांच्या महालात आयोजित केलेल्या मेजवानीला उपस्थिती लावली. या जी-७ बैठकीला भारतालाही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. भारताकडून पंतप्रधाम नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

Web Title: Vaccine: Now the vaccine will be ready in just 100 days, G7 countries will make a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.