शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:44 IST

दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो.

उत्तर: इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधीकधी वेळखाऊ आणि तापदायक ठरू शकते. दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो. ही बाबा अतिशय सामान्य वाटू शकते. पण बऱ्याचदा होणारा विलंब हा सांगण्यात आलेली कागदपत्रं जमा न करल्यानं होतो.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेसाठी अर्जदाराला अनेक कागदपत्रं जमा करावी लागतात. त्यामध्ये (१) सहाय्यक कर परताव्यासाह शपथपत्र, (२) वैद्यकीय परीक्षा, (३) पोलीस प्रमाणपत्रासह नागरी कागदपत्रांचा समावेश होतो. भारतासाठी आवश्यक असलेल्या नागरी कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी कृपया https://travel.state.gov/content/travel/en/us-visas/Visa-Reciprocity-and-Civil-Documents-by-Country/India.html या संकेतस्थळाला भेट द्या. 

व्हिसा मुलाखतीच्या आधी सर्व कागदपत्रं गोळा करा. काही अर्जदारांना मुलाखतीच्या आधी कागदपत्रं अपलोड करण्यास सांगण्यात येतं. जर तुम्ही नागरी कागदपत्रं भरण्यास विसरलात, तर प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. मुलाखतीवेळी सर्व मूळ कागदपत्रं आठवणीनं घेऊन जा.

जर तुमच्याकडे अतिरिक्त कागदपत्रं मागितली गेली, तर ती शक्य तितक्या लवकर जमा करा. तुमच्या फाईलमधील काही गोष्टी विशिष्ट कालावधीसाठीच वैध असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला मिळालेलं पोलीस प्रमाणपत्र व्हिसासाठी केवळ वर्षभरच वैध असतं. कोविड-१९ महामारीमुळे स्टेट डिपार्टमेंटनं त्याची वैधता दोन वर्षे केली आहे. पण कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय यामध्ये बदल होऊ शकतो. तुमची वैद्यकीय परीक्षा फक्त ६ महिन्यांसाठी वैध असते. त्या परीक्षेच्या निकालावरून त्याची वैधता कमी होऊ शकते.

तुमची केस अतिरिक्त कागदपत्रांसाठी प्रलंबित असल्यास, आवश्यक कागदपत्रं लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करा. इतर कागदपत्रं मिळण्यास तुम्हाला विलंब होत असल्यास आणि तुम्ही ती पोलीस प्रमाणपत्र आणि वैद्यकीय परिक्षेची वैधता संपल्यावर जमा केल्यास, तर तुम्हाला कागदपत्रं जमा करण्यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांना पुन्हा विनंती करावी लागते. तुम्ही सर्व कागदपत्रं जमा करण्यापूर्वी आधी जमा केलेल्या कागदपत्रांची वैधता संपल्यास, तुमच्या केसचा निपटारा होण्यासाठी वेळ लागू शकतो. यामुळे सगळ्यांचंच काम वाढतं, नवी कागदपत्रं काढण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होतो.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यात विलंब होऊ नये यासाठी सर्व सूचना नीट वाचा, कागदपत्रं गोळा करण्यास आधीपासूनच सुरुवात करा आणि जेव्हा कागदपत्रांची मागणी करण्यात येईल, तेव्हा ती लवकरात लवकर जमा करा.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास कृपया www.travel.state.gov या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व सूचना उपलब्ध आहेत. एनव्हीसीपासून मुलाखतीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कशी होते, त्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया www.ustraveldocs.com/in वर जा किंवा  (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000 किंवा अमेरिकेतून 1-703-520-2239 या क्रमांकावर संपर्क साधा.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा