शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

यूएस देणार एआय शक्ती, आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; बायडेन यांच्या कार्यकाळातील धाेरण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:55 IST

United State news: एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याशी संबंधित एका अध्यादेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘एआय’ला वैचारिक भिन्नता किंवा सामाजिक धोरणांपासून मुक्त करण्याची तरतूद या आदेशात आहे.

वाॅशिंग्टन - एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याशी संबंधित एका अध्यादेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘एआय’ला वैचारिक भिन्नता किंवा सामाजिक धोरणांपासून मुक्त करण्याची तरतूद या आदेशात आहे.

ट्रम्प यांच्या या आदेशानुसार ट्रम्प यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातील सर्व धोरणे, कार्यवाही तसेच आदेशांमध्ये दुरुस्ती करण्याचे किंवा ते रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. बायडेन यांच्या धोरणांमुळे एआयच्या क्षेत्रात नवोन्मेषावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१९मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्यात अमेरिकेच्या आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेसह एआयमधील वर्चस्वाला मंजुरी देण्यात आली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी (जेएफके), सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येसंबंधीच्या फाईल सार्वजनिक करण्याच्या आदेशावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. (वृत्तसंस्था) 

रशियाने ट्रम्प यांच्या दाव्याची उडवली खिल्लीदावोस परिषदेत तेलाच्या कमती कमी करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याची रशियाने खिल्ली उडवली. युद्ध हे तेलाच्या किमतीवर अवलंबून नसते. रशियाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका,  तसेच सुरक्षा चिंतांकडे अमेरिका व युरोपीय देशांनी दुर्लक्ष केल्यामुळे युक्रेनसोबत संघर्ष उडाल्याचा दावा करत रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केले.पुतीन यांनी युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने युक्रेनशी करार करावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  

ट्रम्प यांचे इतर निर्णयसंरक्षणमंत्री म्हणून ट्रम्प यांचे पीट हेगसेथ यांच्या नावाला प्राधान्य.जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांची भेट घेणार. माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली़ 

ट्रम्प यांना दणका, ‘बर्थराईट’च्या निर्णयाला स्थगितीजन्माधारित अमेरिकी नागरिकत्वाचा अधिकार समाप्त करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत संघीय न्यायालयाने ट्रम्प यांना धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी दिलेला हा आदेश म्हणजे अमेरिकी संविधानाच्या १४व्या दुरुस्तीतील नागरी अधिकारांचे उल्लंघन असल्याचा युक्तिवादी या याचिकांत करण्यात आला आहे.हा अधिकार संपवण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष किंवा संसदेकडे नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका