शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर कब्जा; निकोलस मादुरो न्यूयॉर्कमध्ये अटकेत, डेल्सी रॉड्रिग्ज अंतरीम राष्ट्राध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 08:28 IST

US strikes Venezuela news in Marathi: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मादुरो यांच्या हाताला बेड्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे.

वॉशिंग्टन/काराकास: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक राजकारणात एका ऐतिहासिक आणि अत्यंत धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर थेट लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत लोकशाही पद्धतीने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिका सांभाळणार आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मादुरो यांच्या हाताला बेड्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे. मादुरो यांना एका अमेरिकन युद्धनौकेवरून अमेरिकेत नेण्यात आले. मादुरो यांना हेलिकॉप्टरने न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथे उतरवण्यात आले असून, तिथून त्यांना कडक सुरक्षेत ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (DEA) च्या कार्यालयात नेण्यात आले आहे. मादुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि 'नार्को-टेररिझम'चे गंभीर आरोप आहेत.

अंतरीम राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला विरोध मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची 'अंतरीम राष्ट्राध्यक्ष' म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, रॉड्रिग्ज यांनी शपथ घेतली असून त्या अमेरिकेला सहकार्य करतील. मात्र, रॉड्रिग्ज यांनी सरकारी टीव्हीवर येत अमेरिकेला 'आक्रमणकारी' म्हटले आहे. त्यांनी मादुरो यांच्या सुटकेची मागणी केली असून, ते जिवंत असल्याचा पुरावा देण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे.

नेमकं काय घडलं? शनिवारी पहाटे २ च्या सुमारास काराकासमध्ये एकापाठोपाठ ७ मोठे स्फोट झाले. अमेरिकेच्या विमानांनी राजधानीतील महत्त्वाचे लष्करी तळ, विमानतळ आणि सरकारी इमारतींना लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिक दहशतीखाली रस्त्यावर उतरले होते. काराकासवर झालेल्या या भीषण हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हेनेझुएला सरकारने याला 'साम्राज्यवादी आक्रमण' म्हटले असून देशात आणीबाणी जाहीर केली आहे.

ट्रम्प यांची घोषणा आणि मादुरोंवर आरोपअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत या यशस्वी मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी लष्करी कारवाई केली असून निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आले आहे." मादुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना न्यूयॉर्कमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Allegedly Seizes Venezuela; Maduro Arrested, Interim President Appointed

Web Summary : Reports claim US military action led to Maduro's arrest in Venezuela. Trump announced US control until democratic transition. Delys Rodriguez, interim president, opposes US intervention, demanding proof of Maduro's well-being amidst alleged bombings and imposed state of emergency.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प