'हा दहशतवादी हल्लाच!' दिल्ली बॉम्बस्फोटावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:57 IST2025-11-13T09:55:43+5:302025-11-13T09:57:29+5:30

Delhi Blast Probe: दिल्ली बॉम्बस्फोटावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

US Secretary Rubio Praises Indian Agencies for 'Exceptional Professionalism' in Delhi Blast Probe | 'हा दहशतवादी हल्लाच!' दिल्ली बॉम्बस्फोटावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया

'हा दहशतवादी हल्लाच!' दिल्ली बॉम्बस्फोटावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. केंद्र सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला मानत हा तपास एनआयएकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिल्ली बॉम्बस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली. रुबियो यांनी या स्फोटाला दहशतवादी हल्ला असे संबोधले आहे. तसेच अमेरिकेने मदत देऊ केली असली तरी भारतीय अधिकारी अत्यंत सक्षमपणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत, असेही ते म्हणाले.

बुधवारी कॅनडामध्ये जी-७ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी रुबियो यांनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर चर्चा केली. त्यांनी या घटनेच्या तपासातील भारतीय तपास संस्थांचे कौतुक केले. "आम्ही मदत देऊ केली आहे. परंतु, मला वाटते की ते खूप सक्षम आहेत. त्यांना आमच्या मदतीची आवश्यकता नाही आणि ते चांगले काम करत आहेत. " तसेच या स्फोटाला त्यांनी दहशतवादी हल्ला संबोधले.

दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या एका मोठ्या स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. भारतीय सुरक्षा संस्थांनी या स्फोटाची चौकशी सुरू केली आहे. फॉरेन्सिक टीम आणि दहशतवादविरोधी युनिट्स पुरावे गोळा करत आहेत आणि जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

Web Title : अमेरिकी विदेश मंत्री ने दिल्ली विस्फोट को आतंकी हमला बताया, मदद की पेशकश

Web Summary : अमेरिकी विदेश मंत्री रुबियो ने जयशंकर से मुलाकात के बाद दिल्ली विस्फोट को आतंकी हमला बताया। सहायता की पेशकश करते हुए, रुबियो ने लाल किले के पास दिल्ली विस्फोट के बाद भारत की जांच क्षमताओं को स्वीकार किया, जिसमें बारह लोग मारे गए।

Web Title : US Secretary Calls Delhi Blast a Terrorist Attack, Offers Assistance

Web Summary : US Secretary of State Rubio called the Delhi blast a terrorist attack after meeting with Indian Minister Jaishankar. While offering assistance, Rubio acknowledged India's investigative capabilities following the Delhi explosion near Red Fort that killed twelve.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.