ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांची खिल्ली; "ज्यांची बायको क्रूर वागते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:46 IST2026-04-02T17:45:34+5:302026-04-02T17:46:13+5:30

गेल्या वर्षी व्हिएतनाम येथे दौऱ्यावर मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला होता

US President Donald Trump hilariously mocks France President Emmanuel Macron over wife Viral video | ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांची खिल्ली; "ज्यांची बायको क्रूर वागते..."

ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांची खिल्ली; "ज्यांची बायको क्रूर वागते..."

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची खिल्ली उडवली आहे. मी फ्रान्सच्या मॅक्रॉन यांना फोन केला होता, ज्यांची पत्नी त्यांच्याशी गैरवर्तन करते. आजही ते त्या फाईटमधून बाहेर पडले नाहीत, जी त्यांच्या कानशि‍लात मारली होती असं ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांचे हे बोलणे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आणि ते युट्यूबवर व्हायरल होत आहे. ट्रम्प यांच्या विधानावरून वाद होताच व्हाइट हाऊसने हा व्हिडिओ तातडीने ब्लॉक केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान मागील वर्षी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून केले होते. ज्यात मॅक्रॉन यांची पत्नी व्हिएतनाम दौऱ्यावेळी त्यांना धक्का देताना कॅमेऱ्यात टिपले गेले. त्यानंतर मॅक्रॉन यांनी चुकीचा व्हिडिओ फिरवला जात असल्याचं सांगत पती पत्नीतील वादावर बोलणे टाळले. आता मध्य पूर्वेतील युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सकडे सैन्य मदत मागितली होती परंतु मॅक्रॉन यांनी नकार देताच ट्रम्प यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. 

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आम्हाला त्यांची गरज नव्हती परंतु तरीही मी त्यांच्याकडे मदत मागितली. इमॅन्युअल, आम्हाला आखातात तुमची मदत मिळाली तर आनंद होईल. भलेही आम्ही वाईट लोक आणि बॅलेस्टिक मिसाइल संपवण्यासाठी नवीन रेकॉर्ड बनवत असू. आम्हाला थोडी मदत मिळाली असती तर चांगले झाले असते. जर तुम्ही मदत करू शकत असाल तर तातडीने काही जहाजे पाठवू शकता असं ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना विचारले. त्यावर मॅक्रॉन यांची नक्कल करत नाही, नाही आम्ही असं करू शकत नाही डोनाल्ड, आम्ही युद्ध जिंकल्यानंतर करू शकतो असं त्यांनी सांगताच मी ते फेटाळून लावले. आम्हाला युद्ध जिंकल्यानंतर कुणाच्या मदतीची गरज नाही असं ट्रम्प यांनी सांगितले.

मॅक्रॉन यांचा व्हिडिओ व्हायरल 

गेल्या वर्षी मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला होता. दक्षिण आशियाच्या दौऱ्यात व्हिएतनाममध्ये पोहोचल्यावर राष्ट्रपतींच्या पत्नीने अचानक मॅक्रॉन यांचा चेहरा पकडला आणि बाजूला ओढला. विमानाचा दरवाजा उघडताच मॅक्रॉन लगेच समोर येतात. त्याच क्षणी त्यांच्या पत्नीचा हात पुढे येतो आणि त्या मॅक्रॉन यांचा चेहरा बाजूला ढकलतात. ही घटना विमानातील कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि कॅमेऱ्यात कैद झाली. जेव्हा मॅक्रॉन यांच्या लक्षात येते की व्हिडिओ काढला जात आहे, तेव्हा ते लाजतात, हसतात आणि कॅमेऱ्याकडे हात हलवताना दिसतात. 

 

Web Title : ट्रंप ने मैक्रों का उड़ाया मजाक, पत्नी के 'क्रूर' व्यवहार पर कसा तंज।

Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रों का मजाक उड़ाया, जिसमें मैक्रों की पत्नी द्वारा उन्हें धक्का देने वाले एक पुराने वीडियो का जिक्र था। यह मैक्रों द्वारा मध्य पूर्व में सैन्य सहायता के लिए ट्रम्प के अनुरोध को अस्वीकार करने के बाद हुआ। ट्रम्प ने दावा किया कि उन्हें वैसे भी मदद की ज़रूरत नहीं थी।

Web Title : Trump mocks Macron, jokes about his wife's 'cruel' behavior.

Web Summary : Donald Trump mocked French President Macron, referencing a past video where Macron's wife appeared to push him. This followed Macron denying Trump's request for military aid in the Middle East. Trump claimed he didn't need the help anyway.