अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जागतिक आरोग्य क्षेत्रात खळबळ, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:22 IST2026-01-24T13:20:54+5:302026-01-24T13:22:32+5:30

अमेरिकेच्या कायद्यानुसार संघटनेतून बाहेर पडण्यापूर्वी एक वर्षाची पूर्वसूचना देणे आणि सुमारे २६० दशलक्ष डॉलर्सची सर्व थकबाकी भरणे अपेक्षित होते.

US President Donald Trump big decision, United States officially left the World Health Organization | अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जागतिक आरोग्य क्षेत्रात खळबळ, काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जागतिक आरोग्य क्षेत्रात खळबळ, काय घडलं?

वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयाने जागतिक आरोग्य क्षेत्रात खळबळ माजली आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर पडण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने जागतिक आरोग्य क्षेत्रावर परिणाम होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संस्थेसोबत अमेरिकेची ७८ वर्षांची बांधिलकी संपुष्टात आणण्याची नोटीस दिल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेसोबत केवळ मर्यादित स्वरूपातच काम करेल. संघटनेत निरीक्षक म्हणून सहभागी होण्याची आमची कोणतीही योजना नाही आणि पुन्हा सामील होण्याचाही आमचा विचार नाही. रोग पाळत ठेवणे आणि इतर सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत काम करण्याऐवजी इतर देशांसोबत थेट काम करण्याची अमेरिकेची योजना आहे असं असं एका वरिष्ठ सरकारी आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. 

अमेरिकेच्या कायद्यानुसार संघटनेतून बाहेर पडण्यापूर्वी एक वर्षाची पूर्वसूचना देणे आणि सुमारे २६० दशलक्ष डॉलर्सची सर्व थकबाकी भरणे अपेक्षित होते. परंतु, कायद्यामध्ये माघार घेण्यापूर्वी कोणतेही पेमेंट करण्याची अट आहे यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला. अमेरिकन जनतेने याआधी पुरेसे पैसे दिले आहेत असं परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने म्हटलं. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी रोखला आहे. या संघटनेमुळे अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे असं अमेरिकेकडून सांगण्यात येते. 

दरम्यान, जिनिव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयाबाहेरील अमेरिकेचा ध्वज हटवण्यात आला आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांतून बाहेर पडण्याची पावले उचलली आहेत. त्यात बोर्ड ऑफ पीस या नुकत्याच स्थापन झालेल्या संघटनेच्या माध्यमातून ट्रम्प संयुक्त राष्ट्रांनाच कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्लेषक सांगतात. तर काहींच्या मते, जागतिक आरोग्य संघटनेच्या ऐवजी एक नवीन संस्था स्थापन करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे जी अमेरिकेच्या नेतृत्वात जागतिक आरोग्य क्षेत्रात सुधारणा करेल असा प्रस्ताव ट्रम्प यांच्या विचाराधीन असल्याचा दावा करत आहेत. 

Web Title : ट्रम्प का बड़ा फैसला: अमेरिका WHO से बाहर, वैश्विक स्वास्थ्य में हलचल।

Web Summary : ट्रम्प प्रशासन ने WHO से अमेरिका के बाहर निकलने की घोषणा की, जिससे 78 वर्षों की साझेदारी समाप्त हो गई। अमेरिका अन्य देशों के साथ सीधे काम करने पर ध्यान केंद्रित करेगा। WHO को दी जाने वाली फंडिंग रोक दी गई है। विश्लेषकों का मानना है कि अमेरिका एक नई स्वास्थ्य संस्था स्थापित कर सकता है।

Web Title : Trump's US exits WHO, sparking global health concerns.

Web Summary : The US officially withdrew from the WHO after a year-long notice, ending 78 years of partnership. America plans limited cooperation, focusing on direct work with other countries. Funding was cut, and the US flag was removed from WHO headquarters. A new US-led global health initiative is speculated.