पॉर्नस्टारबरोबरच्या शरीर संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून ट्रम्पनी मोजले 1,30,000 डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 15:23 IST2018-01-13T15:21:40+5:302018-01-13T15:23:31+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या शरीरसंबंधांची वाच्यता करु नये म्हणून अमेरिकन पॉर्नस्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स मोजले आहेत.

US president donald trump allegedly gave money to a porn star to keep silent on | पॉर्नस्टारबरोबरच्या शरीर संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून ट्रम्पनी मोजले 1,30,000 डॉलर्स

पॉर्नस्टारबरोबरच्या शरीर संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून ट्रम्पनी मोजले 1,30,000 डॉलर्स

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या शरीरसंबंधांची वाच्यता करु नये म्हणून अमेरिकन पॉर्नस्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स मोजल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार हे पैसे ट्रम्प यांच्या वकिलांनी 2016 राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

ट्रम्प यांची सध्याची पत्नी मेलानिया हिच्याशी विवाहबद्ध झाल्यावर ट्रम्प स्टेफनी क्लिफोर्डला 2006 साली भेटले असा दावा या वृत्तात केला आहे. मात्र व्हाईट हाऊसने या दाव्यात काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या भेटीची वाच्यता करु नये म्हणून या महिलेला ऑक्टोबर 2016 मध्ये पैसे ट्रम्प यांचे वकिल मायकेल कोहेन यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे या वर्तमानपत्राने लिहिले आहे. यावर हे जुने आणि पुर्वीही प्रसिद्ध झाल्याचे वृत्त असून ते निवडणुकीपुर्वीही नाकारले गेल्याचे व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असणाऱ्या प्रचाराच्या काळातही ट्रम्प यांनी महिलांसबंधी आक्षेपार्ह विधाने केल्याचे व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच अनेक महिलांनी दुर्वर्तन केल्याचे आरोप केले होते. ट्रम्प यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत त्याचा इन्कार केला आहे.
 

Web Title: US president donald trump allegedly gave money to a porn star to keep silent on