शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

इराण अणुकरारातून अमेरिका बाहेर; धक्कादायक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:28 AM

इराणने अणुकार्यक्रम बंद करावा आणि त्याबदल्यात त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवावे यासाठी २०१५ साली झालेल्या करारातून बाहेर पडण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशांना धक्का बसला असून, यामुळे जगासमोर नवे संकेट उभे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो.

वॉशिंग्टन - इराणने अणुकार्यक्रम बंद करावा आणि त्याबदल्यात त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवावे यासाठी २०१५ साली झालेल्या करारातून बाहेर पडण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशांना धक्का बसला असून, यामुळे जगासमोर नवे संकेट उभे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो.ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह संयुक्त राष्ट्राचे महासचिव अ‍ॅण्टोनिओ गुटेरेस यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली. ओबामा यांनी इराणशी केलेला करार ‘परफेक्ट’ होता, असेही संयुक्त निवेदनात म्हटले आहे. याचे आम्ही पालन करू, असेही त्यांनी म्हटले आहे.रशिया म्हणाला, ट्रम्प यांचा निर्णय निराशाजनक असून, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवले आहेत. चीन म्हणाला, ट्रम्प यांचा निर्णय चिंताजनक असून, आम्ही याचा निषेध करतो. आम्ही इराणशी असलेले संबंध तसेच ठेवू. इतर देशांनीही योग्य निर्णय घ्यावा.ट्रम्प यांच्या बाजूने कोण?ट्रम्प यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- नेतन्याहू, पंतप्रधान, इस्रायलकरारातून बाहेर पडण्याच्या आणि इराणवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- परराष्ट्र खाते, सौदी अरेबियाट्रम्प यांनी बाहेर पडण्याचे दिलेली कारणे1. हे स्पष्ट आहे, की आम्ही इराणच्या अणुबॉम्बलारोखू शकत नाही. हा करार सदोष आहे.2. कराराने इराणला रोख कोट्यवधी दिले; परंतु आण्विक शस्त्रे हस्तगत करण्यापासून रोखले नाही.3. अणुकार्यक्रमाचा वापर इराण अस्त्र बनविण्यासाठी करत आहे. बॅलेस्टिक मिसाइल तयार करत आहे. सीरिया, यमेन आणि इराकमध्ये दहशतवादी देशांना शस्त्रेही पुरवत आहेत.4. इराणवर येत्या तीन ते सहा महिन्यांत निर्बंध लादण्यात येतील. तेल क्षेत्र, विमान निर्यात, धातूंचा व्यापार आणि डॉलर खरेदी करण्याचा सरकारची योजना यावर निर्बंध घालण्यात येतील.ध्वज जाळून अमेरिकाविरोधात घोषणाबाजीइराणच्या खासदारांनी संसदेच्या आवारात अमेरिकेचा ध्वज जाळून ‘अमेरिका मेली’ अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांना केवळ दबावाची भाषा कळते, अशी टीका इराणच्या संसद अध्यक्षांनी केली.इराणचे प्रत्युत्तरकोणता देश या करारांचे पालन करत नाही हे उघड झाले. करार कायम राहावा यासाठी अन्य देशांशी चर्चा करू. आता इराण युरेनियम साठ्यात वाढ करेल, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिला.ओबामा म्हणाले,ही घोडचूकट्रम्प यांचा निर्णय ही घोडचूक आहे. कारण अमेरिकेची विश्वासार्हताच पणाला लागेल. जगासाठी हे धोकादायक आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिकाnewsबातम्या