महिला अन् मुलीचा जीव होता धोक्यात, वाचवण्यासाठी १०० फूट खोल धबधब्यात मारली उडी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 13:12 IST2021-11-16T13:09:43+5:302021-11-16T13:12:29+5:30
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पोर्टलॅंड येथील शेन राउंडी पब्लिक टॉयलेटबाहेर आपल्या मुलीची वाट बघत होता.

महिला अन् मुलीचा जीव होता धोक्यात, वाचवण्यासाठी १०० फूट खोल धबधब्यात मारली उडी आणि मग...
अमेरिकेत (US) एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावत धबधब्यात पडत असलेल्या महिला आणि तिच्या मुलीचा जीव वाचवला. महिला आणि तिची मुलगी साधारण १०० फूट खोल धबधब्यात पडणार होत्या. तेव्हची ही व्यक्ती तिथे आली आणि त्याने दोघींनाही सुरक्षित बाहेर काढलं. आपल्या या बहादुरीसाठी या व्यक्तीचं कौतुक केलं जात आहे. लोक त्याला रिअल लाइफ हिरो म्हणत आहेत.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पोर्टलॅंड येथील शेन राउंडी पब्लिक टॉयलेटबाहेर आपल्या मुलीची वाट बघत होता. तेव्हा अचानक त्याला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. राउंडी लगेच तिथे पोहोचला आणि त्याला दिसलं की, एक महिला पुलावरून पडून झाडाला लटकली आहे आणि तिची मुलगी खाली पाण्यात पडली आहे. अशात राउंडीने आपल्या जीवाची पर्वा न करता पुलावरील लोखंडी रेलिंगवरून उडी घेत झाडावर चढला.
थंड पाण्यात मारली उडी
शेन राउंडीला बघून जीवन आणि मृत्यूच्या दारात असलेल्या महिलेत आशा निर्माण झाली. तिने रडत सांगितलं की, आधी माझ्या मुलीला वाचवा. यानंतर राउंडीने थंड पाण्यात उडी मारली आणि मुलीला भिंतीजवळ नेलं. तिथे उपस्थित लोकांच्या मदतीने त्यांनी मुलीला बाहेर काढलं. नंतर तो महिलेला वाचवण्यासाठी पुन्हा परत गेला. यावेळी त्याला जखमाही झाल्या. मात्र, त्याने महिलेलाही सुखरूप बाहेर काढलं.
रेस्क्यू दरम्यान ओलिविया आणि तिच्या मुलीला काही जखमा झाल्या. दोघांनाही स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मुल्नोमाह फॉल्स बघताना झाली होती. धबधबा बघताना महिलेचा पाय पुलावरून घसरला आणि मुलगी खाली थंड पाण्यात पडली तर महिला झाडावर लटकली. हे बघून शेन राउंडी याने त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली.