शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

US-Israel Iran Strike LIVE: इराणचा अमेरिकेच्या विमानवाहू जहाजावर मोठा हल्ला; तीन अमेरिकन सैनिक ठार, पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 20:49 IST

US-Israel Iran Strike Latest News & LIVE Updates:  शनिवारीपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने ...

01 Mar, 26 08:48 PM

इराणच्या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार

इराणी हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आणि पाच गंभीर जखमी झाले.

01 Mar, 26 08:46 PM

इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

इराणने अमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे म्हटले. आयआरजीसीने सांगितले की त्यांनी आखातातील अमेरिकन सैन्यावर हल्ला केला, ज्यामध्ये विमानवाहू जहाजाला लक्ष्य केले. हा हल्ला अमेरिका आणि इस्रायली यांनी संयुक्त हल्ल्यांमध्ये  खामेनी यांची हत्या केल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला.

01 Mar, 26 08:00 PM

आम्ही आमच्या शेजारी देशांवर हल्ला करत नाहीये- इराणचे परराष्ट्र मंत्री

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सांगितले की तेहरान त्यांच्या भावांवर हल्ला करत नाहीये. "आम्ही फक्त अमेरिकन लक्ष्यांवर हल्ला करत आहोत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे अराघची म्हणाले.
 

01 Mar, 26 07:45 PM

सौदी अरेबियाने इराणच्या राजदूताला बोलावले

मध्य पूर्वेतील अमेरिकन हवाई तळांवर इराणने केलेल्या जलद क्षेपणास्त्र हल्ल्यासह आखाती देशांवरील हल्ल्यांबद्दल चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाने इराणच्या राजदूताला बोलावले आहे.

01 Mar, 26 07:13 PM

खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानात हिंसाचार उफाळला

खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानात अशांतता पसरली आहे. कराची आणि लाहोरमध्ये हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. इस्लामाबादमध्ये आंदोलकांना समजवण्यासाठी मोहसीन नक्वी यांनी केलेल्या प्रयत्नांचा कोणताही परिणाम झाला नाही. यानंतर, संपूर्ण इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे आणि इस्लामाबाद पोलिसांच्या आयजींनी आंदोलकांवर बळाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

01 Mar, 26 06:55 PM

पंतप्रधान मोदींनी बोलावली सीसीएस बैठक

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेणार आहेत. सीसीएसच्या बैठकीसाठी अध्यक्षपदी पंतप्रधान मोदी असतील आणि त्यात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित राहतील.

01 Mar, 26 05:14 PM

अयातुल्लाह खामनेई यांच्या हत्येविरोधात कारगिलमध्ये शिया मुस्लिमांकडून तीव्र निदर्शने

अयातुल्लाह खामनेई यांच्या हत्येविरोधात कारगिलमध्ये शिया मुस्लिमांकडून तीव्र निदर्शने केली

01 Mar, 26 03:52 PM

इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसवी यांचा हल्ल्यात मृत्यू

इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसवी यांचा हल्ल्यात मृत्यू, मौसवी यांच्यासोबतच इराणच्या संरक्षण यंत्रणेतील ७ बडे सदस्य आणि ४० कमांडर्सचा मृत्यू, इस्राइली डिफेन्स फोर्सने दिली माहिती

01 Mar, 26 03:43 PM

जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

खामेनेई यांच्या हत्येविरोधात जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

01 Mar, 26 03:23 PM

भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले

इस्रायल-इराण युद्धामुळे मध्य प्रदेशातील अनेक प्रवासी शारजाहमध्ये अडकले आहेत. शारजाहून इंदूरला येणारे 'एअर इंडिया एक्सप्रेस'ची फ्लाईट कॅन्सल करण्यात आली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील १०० हून अधिक प्रवासी दुबई आणि शारजाह विमानतळावर अडकले आहेत.  दुबईमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी गेलेले इंदूरचे भाजपा नेते आणि माजी आमदार संजय शुक्ला हे देखील तिथे अडकले आहेत. संजय शुक्ला यांच्यासोबत अनेक मोठे नेते, उद्योगपती असल्याची माहिती मिळत आहे.  वाचा सविस्तर

01 Mar, 26 03:18 PM

न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांनी इराणवरील हल्ल्याच्या केला निषेध

न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांनी इराणवरील हल्ल्याच्या निषेध केला

01 Mar, 26 02:40 PM

इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री

 इराणमधील भयंकर परिस्थिती पाहून अभिनेत्री मंदाना करीमी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाली आहे. ढसाढसा रडत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंदाना करीमी मूळची इराणची राजधानी तेहरानची आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती भारतात राहत आहे. आता इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या लोकांच्या सुरक्षेबाबत ती चिंतेत आहे. मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. वाचा सविस्तर

01 Mar, 26 02:27 PM

खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; कोणकोणत्या देशांवर इराणने हल्ला केला? जाणून घ्या...

Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’, तर इस्रायलने ‘लायन्स रोर’ असे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई ठार झाले असून, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडरही मारले गेल्याचे वृत्त आहे. या घडामोडींनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून, इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत या प्रदेशातील अमेरिकन व सहयोगी देशांतील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स आणि सुसाइड ड्रोन वापरून मध्य-पूर्वेतील अनेक देशांवर हल्ले केले. मध्य-पूर्वेत एकूण 17 देश असून, त्यापैकी 9 देशांवर इराणने हल्ले केल्याचा दावा आहे.

01 Mar, 26 02:17 PM

खामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक, आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू

इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील  दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. दरम्यान, आंदोलकांना हुसकावून लावून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ८ आंदोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

01 Mar, 26 02:16 PM

युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय?

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर शनिवारी इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले आहेत. यादरम्यान, इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले असून, इराणकडून इस्राइलसोबतच संयुक्त अरब अमिराती, बहरीनसह इतर आखाती देशांनांही लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे इराण या आखाती देशांना का लक्ष्य करतोय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
वाचा संपूर्ण बातमी - युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय?

01 Mar, 26 01:35 PM

30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला खामेनेई यांचा अंत

इराणवरअमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये करण्यात येतोय. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी झालेल्या या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या 30 सेकंदांत इराणमधील 3 महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 30 वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. 

01 Mar, 26 01:10 PM

इराणने नवीन कमांडर-इन-चीफची घोषणा केली

इराणने आपले नवीन कमांडर-इन-चीफ जाहीर केले आहे. ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी यांनी पदभार स्वीकारला आहे.

01 Mar, 26 12:50 PM

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठा दावा केला

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे की, इराणने थेट आणि प्रॉक्सीजद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला बळी म्हणून दाखवून आपल्या कृती लपवण्याचा प्रयत्न केला.

01 Mar, 26 12:27 PM

अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. एलनाजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी शेअर केली. "ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि अविश्वसनीय बातमी आहे. ज्या बातमीची आम्ही गेली ४७ वर्षे वाट पाहत होतो, ती अखेर आली. खामेनेई  यांचा मृत्यू झाला आहे. देव महान आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तसेच एलनाजने दुसऱ्या एका स्टोरीमध्ये ही बातमी शेअर करताना 'थँक्यू' म्हणत आनंदाचे इमोजी देखील पोस्ट केले आहेत. वाचा सविस्तर

01 Mar, 26 12:23 PM

ट्रम्प यांनी आणखी एक इशारा दिला

इराणच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आयआरसीजीचा हवाला देत वृत्त दिले की इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि इस्रायली लक्ष्यांवर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला आणखी एक इशारा दिला, "तुम्ही आमची लाल रेषा ओलांडली आहे."

01 Mar, 26 12:12 PM

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण संतप्त

इराणने आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. अमेरिका शरण येईपर्यंत लढाई सुरूच राहील, असेही इराणने म्हटले आहे.

01 Mar, 26 11:54 AM

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी खामेनेई यांच्या हत्येचा आनंद साजरा केला

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि देशाच्या सैन्याचे अभिनंदन केले आहे. काट्झ यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इस्रायलचा नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवण्यात आले आहे, न्याय मिळाला आहे" ते पुढे म्हणाले की इस्रायल पूर्ण ताकदीने कारवाई करत राहील.

01 Mar, 26 11:39 AM

'सेताद' : खामेनेईंच्या सत्तेचा आर्थिक कणा

खामेनेईंची संपत्ती कोणत्याही खाजगी बँक खात्यात नव्हती, तर ‘सेताद’ नावाच्या एका महाकाय संघटनेच्या माध्यमातून ती नियंत्रित केली जात असे. १९७९ च्या क्रांतीनंतर जप्त करण्यात आलेली रिअल इस्टेट, कॉर्पोरेट शेअर्स आणि तेल उद्योगातील मालमत्ता यातून हे साम्राज्य उभे राहिले. ही संघटना इराणची संसद किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेला उत्तरदायी नव्हती. ती थेट सर्वोच्च नेत्याच्या आदेशावर चालत असे. २०१३ मध्ये रॉयटर्सच्या तपासणीत ही मालमत्ता ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये) असल्याचे समोर आले होते.

01 Mar, 26 11:22 AM

'आम्ही कधीही न पाहिलेला हल्ला करू'

इराणने अमेरिकेला दिलेल्या धमकीनंतर ट्रम्प म्हणाले, "इराणने नुकतेच सांगितले की ते आज एक अतिशय शक्तिशाली हल्ला करणार आहेत, जो त्यांनी पूर्वी कधीही न केलेल्यापेक्षाही शक्तिशाली असेल. पण त्यांनी तसे न करणे चांगले, कारण जर त्यांनी असे केले तर आम्ही कधीही न पाहिलेला शक्तिशाली हल्ला करू."

01 Mar, 26 11:02 AM

सोने आणि कच्चे तेल महागणार

 अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे गंभीर पडसाद भारतीय कमोडिटी बाजारात उमटणार आहेत. उद्या, सोमवारी बाजार उघडताच सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीसह सुरुवात पाहायला मिळू शकते. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने डागलेली क्षेपणास्त्रे यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे मोर्चा वळवला आहे.

01 Mar, 26 11:02 AM

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी MEA ने सूचना जारी

परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व परदेशी नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सल्लागार जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की ज्या परदेशी नागरिकांना त्यांचा प्रवास रद्द करावा लागला आहे किंवा ज्यांचे परतणे उशिरा झाले आहे आणि ज्यांना व्हिसा वाढवणे किंवा त्यांच्या वास्तव्याचे नियमितीकरण आवश्यक आहे त्यांनी त्यांच्या जवळच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (FRRO) संपर्क साधावा.

01 Mar, 26 10:22 AM

दुबईमध्ये मोठे स्फोट ऐकू आले

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दुबईमध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले. कतारची राजधानी दोहामध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

01 Mar, 26 09:53 AM

सोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले

 अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मध्यपूर्वेतही हल्ले होत असल्यामुळे तेथील हवाई वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत. वाचा सविस्तर

01 Mar, 26 09:42 AM

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं होतं.  वाचा सविस्तर

01 Mar, 26 09:18 AM

इराकी सैन्याचा अमेरिकन तळावर हल्ला

वृत्तानुसार, इराकी प्रतिकार दलांनी इराकी कुर्दिस्तानमधील अमेरिकन तळांवर हल्ले सुरू केले आहेत. एर्बिलला लक्ष्य करण्यात आले आहे.

01 Mar, 26 09:17 AM

ड्रोन हल्ल्यांनंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल

ड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे लोक घाबरलेले आहेत. याच भीती आणि चिंतेच्या वातावरणात एका भारतीय उद्योजकाने आपल्या आईचा व्ह़ॉट्सएप मेसेज शेअर केला आहे, ज्यातून स्पष्ट दिसतं की, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही आता लोकांच्या मनात भीती घर करून बसली आहे. हाँगकाँगमध्ये राहणारे भारतीय व्यावसायिक प्रकाश ददलानी यांनी आपल्या कुटुंबाच्या व्ह़ॉट्सएप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. वाचा सविस्तर

01 Mar, 26 09:04 AM

दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

दुबईमध्येही हल्ले होत असून तेथील आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू याने दुबईतील या भयानक दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा सविस्तर

01 Mar, 26 09:02 AM

'अमेरिका-इस्रायली तळांवर "सर्वात जलद" हल्ला सुरू होईल'

इराणी राज्य माध्यमांनुसार, इराणच्या आयआरजीसीने म्हटले आहे की इस्रायली आणि अमेरिकन तळांवर "सर्वात जलद" हल्ला लवकरच सुरू होईल.

01 Mar, 26 08:42 AM

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू

इस्रायलनेइराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'IRNA' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, दक्षिण इराणमधील होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरात असलेल्या एका मुलींच्या शाळेवर अमेरिका आणि इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या भीषण हल्ल्यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. अलीकडील लष्करी मोहिमेदरम्यान हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.  वाचा सविस्तर

01 Mar, 26 08:39 AM

भारताने मध्य पूर्वेला जाणारी शेकडो उड्डाणे रद्द केली

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आणि तेहरानने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांमुळे शनिवारी ४१० उड्डाणे रद्द करण्यात आली. रविवारीही हे व्यत्यय कायम राहण्याची अपेक्षा आहे, तर आणखी ४४४ उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. या वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेतील हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. एअर इंडिया आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्यांनी मध्य पूर्वेतील सर्व उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली. प्रादेशिक हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर तेल अवीवला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेतच परतण्यास भाग पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

01 Mar, 26 08:20 AM

हल्ल्यात शेकडो अमेरिकन सैनिक ठार झाल्याचा इराणचा दावा

प्रेस टीव्हीच्या वृत्तानुसार, इराणच्या आयआरजीसीचा दावा आहे की ,१४ अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात आले होते. प्रत्युत्तरात शेकडो अमेरिकन सैनिक ठार झाले.

01 Mar, 26 08:15 AM

खामेनेई यांच्या समर्थनार्थ इराणमधील लोक रस्त्यावर उतरले

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या दाव्यांदरम्यान, संपूर्ण इराणमधील लोक पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. लोक खामेनेई यांच्या समर्थनार्थ एकत्र येत आहेत आणि देशाच्या समर्थनार्थ एकत्र येत आहेत. 

01 Mar, 26 08:09 AM

इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी सल्ला

इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी सांगितले की, आम्ही इस्रायलमध्ये तात्पुरते राहणाऱ्या आणि निघून जाणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात आहोत. हवाई क्षेत्र सध्या बंद आहे, त्यामुळे परिस्थितीनुसार त्यांचे सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. सध्या, परिस्थिती रस्ते प्रवासासाठी अनुकूल नाही. आम्ही इस्रायलमधील भारतीयांसाठी दोन सूचना जारी केल्या आहेत. सर्वांना सल्लागार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

01 Mar, 26 08:07 AM

अली खामेनेई हे इराणचे 'सर्वोच्च नेते' होते

इराणी माध्यमांनी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. अली खामेनेई हे १९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते होते. त्यांनी देशाचे सर्वात शक्तिशाली पद भूषवले होते आणि लष्करापासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचे अंतिम नियंत्रण होते. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून ते इराणच्या राजकीय आणि धार्मिक दिशानिर्देशांना आकार देत आहेत. १९३९ मध्ये मशहाद येथे जन्मलेले खामेनेई हे रुहोल्लाह खोमेनेई यांच्यानंतर देशाचे दुसरे सर्वोच्च सत्तेचे केंद्र बनले. त्यांनी लष्करी, न्यायिक आणि माध्यम संस्थांवर आपले वर्चस्व कायम ठेवले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून ते राजकारणात सक्रिय राहिले. त्यांच्या कार्यकाळात पाश्चात्य देशांसोबतचा तणाव आणि मध्य पूर्व भूराजकारणात इराणची भूमिका निश्चित झाली.

01 Mar, 26 08:04 AM

इराणचा पुढचा सर्वोच्च नेता कोण असेल?

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यानंतर आता संभाव्य उत्तराधिकाऱ्यांवर जग बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील सर्वोच्च नेत्याची निवड तज्ञांची सभा निश्चित करेल. मोज्तबा खामेनेई, अलिरेझा अराफी, मोहम्मद मेहदी मीरबाघेरी, हसन खामेनेई आणि हाशेम होसेनी बुशेहरी यांच्या नावंची चर्चा सुरू आहे. ही निवड इराणच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची आणि प्रशासनाची दिशा निश्चित करेल. सत्तेचे हे संक्रमण देशाच्या धार्मिक आणि राजकीय रचनेत एक महत्त्वपूर्ण वळण ठरेल. ही प्रक्रिया इराणच्या स्थिरतेसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची आहे.

टॅग्स :IranइराणAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईwarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायलDubaiदुबई