"इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!", ट्रम्प यांनी भारत, ब्रिटनसह जगाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:39 IST2026-03-31T17:21:14+5:302026-03-31T17:39:22+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवरून मध्य पूर्वेतील तणावावर खळबळजनक विधान केले आहे.

US Israel Iran War We have finished Iran, now you show courage!", donald Trump told the world including India and Britain | "इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!", ट्रम्प यांनी भारत, ब्रिटनसह जगाला सुनावले

"इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!", ट्रम्प यांनी भारत, ब्रिटनसह जगाला सुनावले

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झाला आहे. 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक देशांना जेट इंधनाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जगभरातील नेत्यांना सुनावले आहे. 

रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून मित्रदेशांवर, विशेषतः ब्रिटनवर आगपाखड केली. "ज्या देशांनी इराणविरुद्धच्या मोहिमेत अमेरिकेला साथ दिली नाही, त्यांना आता स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल," असेही ट्रम्प म्हणाले. यामुळे आता आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडू शकते.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये युनायटेड किंगडमचा उल्लेख केला आहे. "ज्या देशांना हॉर्मुझच्या संकटामुळे जेट इंधन मिळत नाहीये,जसे की युनायटेड किंगडम, ज्यांनी इराणमधील मोहिमेत सामील होण्यास नकार दिला होता. त्यांच्यासाठी माझ्या दोन सूचना आहेत," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

"आमच्याकडे इंधनाचा मुबलक साठा आहे, तुम्ही तो आमच्याकडून विकत घेऊ शकता. थोडी हिंमत एकवटून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जा आणि तुमचे इंधन तिथून 'टेक' करा, अशा सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या. तुम्हाला आता स्वतःसाठी लढायला शिकावे लागेल. अमेरिका यापुढे तुम्हाला मदत करणार नाही, कारण तुम्हीही आम्हाला गरज असताना साथ दिली नव्हती, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"इराण आता संपला"

इराणवर  भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, "इराण आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जे कठीण काम होते, ते अमेरिकेने पूर्ण केले आहे. आता पुढील मार्ग तुम्हाला स्वतःलाच शोधावा लागेल.

ट्रम्प यांच्या या विधानातून त्यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मित्रदेशांनी लष्करी मोहिमांमध्ये साथ दिली नाही, तर अमेरिका देखील त्यांच्या आर्थिक किंवा इंधन संकटात धावून येणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. 

Web Title : ट्रंप का विश्व को संदेश: हमने ईरान खत्म किया, अब हिम्मत दिखाओ!

Web Summary : हॉर्मुज जलसंधि तनाव के बीच, ट्रंप ने देशों, विशेषकर ब्रिटेन से, अपनी रक्षा करने को कहा। उन्होंने अमेरिका से ईंधन खरीदने या बहादुरी से अपना ईंधन सुरक्षित करने का सुझाव दिया, और कहा कि अमेरिका उनका साथ नहीं देगा जिन्होंने उनका समर्थन नहीं किया।

Web Title : Trump to World: We Finished Iran, Now Show Some Courage!

Web Summary : Amidst Strait of Hormuz tensions, Trump tells countries, especially Britain, to protect themselves. He suggests buying US fuel or bravely securing their own, stating America won't help those who didn't support them.