वॉशिंग्टन - इराणसोबत अमेरिका इस्रायल युद्धाला आज ५ आठवडे झाले परंतु मध्य पूर्वेतील हा संघर्ष आणि तणाव संपण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. स्ट्रेट होर्मुझ खुला करण्यासाठी अमेरिकेने इराणला आधीच धमकी दिली आहे परंतु यात अमेरिकेच्या सहकारी देशांनी इराण युद्धात उतरण्यास नकार दिला आहे. या देशांमध्ये ब्रिटन, जर्मनी, स्पेस, ऑस्ट्रेलिया आणि आता इटलीचा समावेश आहे.
इराणविरुद्ध युद्धात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प एकटे पडताना दिसत आहेत. इराणवरील हल्ल्याबाबत राष्ट्रपती स्वत: गोंधळलेले दिसतात. कधी ते चर्चा सुरू असल्याचे सांगतात तर कधी इराणवर जमिनीवरील सैन्य कारवाईची धमकी देतात. या युद्धामुळे आता अमेरिकेतही अंतर्गत विरोध वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करताना देशाला विश्वासात घ्यायला हवे होते, कुठलाही विचार न करता हा हल्ला केला. जी त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचा आरोप लोक करत आहेत आणि अनेक लोक यासाठी रस्त्यावर उतरलेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने रिपोर्ट दिला आहे. ज्यात अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनी त्यांच्या सहकारी देशांना इराणविरोधात सैन्य मोहिम संपवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले. भलेही स्ट्रेट ऑफ होर्मुझ दीर्घकाळासाठी बंद का असेना असं ते म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाऊ न दिल्यास अमेरिका इराणच्या वीज प्रकल्प आणि तेल विहिरी नष्ट करेल अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. जगातील २० टक्के तेल वाहतूक असणाऱ्या होर्मुझला पुन्हा सुरू करण्यासाठी गुंतागुंतीची मोहीम ट्रम्प पुढे ढकलतील. जर सक्तीने मार्ग पुन्हा सुरू करण्याच्या मोहिमेमुळे युद्ध चार ते सहा आठवड्यांच्या मुदतीपलीकडे वाढेल असं ट्रम्प यांनी म्हटलं.
ब्रिटनने केले हात वर, इटली-स्पेनचाही साथ देण्यास नकार
इराण युद्धात ब्रिटन सहभागी न झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी युद्धात आपल्या एअरस्पेसचा वापर आणि ब्रिटीश सैन्य पाठवण्यास नकार दिला. ही लढाई आमची नाही. आम्ही यात सहभागी होणार नाही. UK स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु आम्ही युद्धात पडणार नाही असं ब्रिटनने स्पष्ट केले. ब्रिटनच्या आधी स्पेननेही अमेरिकन विमानांना त्यांच्या एअरस्पेसचा वापर करण्याची परवानगी दिली नाही. इटलीनेही अमेरिकेच्या काही बॉम्बर्सला मध्य पूर्वेत जाण्यासाठी सिसली येथील एअरबेसवर उतरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे इराण युद्धात अमेरिका एकटी पडली आहे.
Web Summary : Trump faces isolation in the Iran conflict as allies decline military support. Internal opposition in America grows due to Trump's unilateral actions, criticized for bypassing consultation and escalating tensions without consensus.
Web Summary : ईरान संघर्ष में ट्रंप अलग-थलग पड़ गए हैं क्योंकि सहयोगियों ने सैन्य समर्थन से इनकार कर दिया है। ट्रंप की एकतरफा कार्रवाइयों के कारण अमेरिका में आंतरिक विरोध बढ़ रहा है, बिना परामर्श के तनाव बढ़ाने के लिए आलोचना की गई है।