जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर १०६ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. यावर डोनाल्ड ट्रम्प यांना काहीच वाटत नसून ही जगासाठी छोटीशी किंमत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. "इराणसोबत युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील, मात्र अमेरिका आणि जगासाठी ती एक 'छोटी किंमत' असेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे जागतिक बाजारपेठेत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले होते की, इराणच्या आण्विक तळांवर हल्ला झाल्यास जागतिक स्तरावर तेलाचे भाव वाढतील, त्यावर तुमचे काय मत आहे? यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "हो, तेलाच्या किमती वाढतील, पण आपण एका मोठ्या धोक्याला (इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम) कायमचे संपवू. सुरक्षित जगासाठी ही एक अत्यंत छोटी किंमत असेल."
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष विकोपाला गेल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी वाढ गेल्या अनेक महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर येणाऱ्या काळात तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतावर काय होणार परिणाम?भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात १०६ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. यामुळे महागाई वाढण्याची दाट शक्यता असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
शेअर बाजारातही पडझडयुद्धाच्या वृत्तामुळे जागतिक शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून सोन्याच्या किमतीतही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Web Summary : Crude oil prices surged to $106 after US-Iran tensions escalated. Trump stated this was a "small price" for global security, despite concerns over inflation and stock market declines, particularly impacting India's fuel costs.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव बढ़ने के बाद कच्चे तेल की कीमतें 106 डॉलर तक पहुंच गईं। ट्रम्प ने कहा कि यह वैश्विक सुरक्षा के लिए "छोटी कीमत" है, जबकि भारत में ईंधन की लागत पर असर पड़ने की आशंका है।