इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:10 IST2026-04-13T15:08:07+5:302026-04-13T15:10:26+5:30

या सुरक्षा प्लॅननुसार हवाई हद्दीत दिशाभूल करण्यासाठी एक नागरी विमानही उडवण्यात आले होते. कमांड आणि नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) विमाने तैनात केली

US Iran Talks: Pakistan put all its strength into ensuring the safety of Iranian leaders; How was the planning done? | इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?

इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?

इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे. मात्र या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला तगडी तयारी करावी लागली. विशेषत: इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने डोळ्यात तेल घातले. इस्रायलने तेहरानमध्ये अनेक उच्च स्तरीय नेते मारले. त्यामुळे पाकिस्तान इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी कुठलीही जोखीम पत्करायला तयार नव्हते. इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने विशेष हवाई सुरक्षा अभियान राबवले होते. कुठलीही रिस्क पाकिस्तानला घ्यायची नव्हती असं एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानी हवाई दल आणि सुरक्षा मोहीमेशी निगडित एका अधिकाऱ्याने सांगितले की, १० एप्रिल शनिवारी रात्री २ इराणी विमाने इस्लामाबादला पोहचण्यापूर्वी पाकिस्तानने अरबी समुद्रावर दक्षिण पश्चिम क्षेत्रात बहुस्तरीय हवाई संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध कवच एक्टिव्ह केले होते. इराणी विमानांना कुठलाही धोका होऊ नये यासाठी पाकिस्तानने वॉरफेअर सपोर्ट सिस्टम चालू केली होती. त्यात सर्व एअर सर्व्हिलान्स रडार सक्रीय होते आणि एअर डिफेन्ससोबत मिसाइल सिस्टमही हाय अलर्ट ठेवण्यात आल्या होत्या. 

या सुरक्षा प्लॅननुसार हवाई हद्दीत दिशाभूल करण्यासाठी एक नागरी विमानही उडवण्यात आले होते. कमांड आणि नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) विमाने तैनात केली. पाकिस्तानी गुप्तचर सूत्रांनी इस्रायली हल्ल्याची भीती वर्तवली होती. इराणच्या सीमेवर तसेच अरबी बेटांवरून लांब पल्ल्याच्या विमानांच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या हालचाली शोधणे आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याचे काम AWACS विमानांवर सोपवण्यात आले होते.  पाकिस्तानी हवाई दलाने पाकिस्तानी AWACS संरक्षणाखाली असताना इराणची दोन्ही विमाने IRAN04 आणि IRAN05 यांची सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक विमान-ट्रॅकिंग डेटा देखील बंद करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी एअर-मोबिलिटी डिसेप्शन या डावपेचाचा वापर केला, ज्यामध्ये पाकिस्तानने इराणच्या विमानांना शोधले जाण्याचा किंवा अडवले जाण्याचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्या समांतर एक नागरी A-321 विमान उडवले.

मिसाइलनं सज्ज होती लढाऊ विमाने

दरम्यान, पाकिस्तानी हवाई सैन्याची लढाऊ विमाने, ज्यात एंटी एअरक्राफ्ट मिसाइल J-10C आणि JF17 थंडर विमानांचा समावेश होता. त्यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीत इराणी विमानांना सुरक्षा दिली होती. या विमानांमधून इस्लामाबाद शांतता चर्चेसाठी इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी प्रवास करत होते. 

Web Title : ईरानी नेताओं की सुरक्षा के लिए पाकिस्तान ने लगाई पूरी ताकत

Web Summary : इस्लामाबाद में शांति वार्ता के दौरान पाकिस्तान ने ईरानी नेताओं की सुरक्षा सुनिश्चित की। हवाई सुरक्षा सक्रिय की, लड़ाकू विमान तैनात किए। संभावित हमलों से बचने के लिए नागरिक विमान का इस्तेमाल किया गया। इजरायली हमलों के डर से उपाय किए गए।

Web Title : Pakistan's High-Stakes Security for Iranian Leaders Amid Peace Talks

Web Summary : Pakistan ensured maximum security for Iranian leaders during peace talks in Islamabad, activating air defenses and deploying fighter jets. AWACS planes monitored Iranian borders. A civilian plane was used as a decoy to avert potential attacks. The measures were taken due to fear of Israeli attacks.