कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ? अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणचे सुप्रीम लीडर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:32 IST2026-03-24T13:30:08+5:302026-03-24T13:32:33+5:30

US-Iran Conflict: गालिबफ यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस जाणार!

US-Iran Conflict: Who is Mohammad Ghalibaf? Will he become Iran's Supreme Leader with US support? | कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ? अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणचे सुप्रीम लीडर होणार?

कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ? अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणचे सुप्रीम लीडर होणार?

US-Iran Conflict: अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांच्या माध्यमातून अमेरिकेला आपले हित साधायचे आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार ट्रम्प प्रशासन त्यांना भविष्यातील सुप्रीम लीडर म्हणूनही पाहत असल्याची चर्चा आहे.

अमेरिका-इराण चर्चेवर संभ्रम कायम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र इराणने अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर सीजफायर आणि संभाव्य कराराबाबत अमेरिकेच्या एका रणनीतीचा खुलासा झाला आहे. अमेरिका इराणमधील प्रभावशाली आणि कट्टरपंथी नेनेते मोहम्मद बाघेर गालिबफ यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ?

मोहम्मद बाघेर गालिबफ हे सध्या इराणच्या संसदचे स्पीकर असून, त्यांना कट्टरपंथी नेते मानले जाते. ते इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे विश्वासू होते. गालिबफ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डमध्ये सैनिक म्हणून केली. नंतर ते या दलात जनरल पदापर्यंत पोहोचले. सैन्यातून बाहेर पडल्यानंतर ते तेहरानचे महापौर झाले. त्यांनी दोन वेळा इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूल लढवली होती. मात्र, 2013 मध्ये हसन रुहानी आणि 2024 मध्ये मसूद पेजेखीन यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

अमेरिकेची रणनीती काय?

अमेरिकन सुरक्षा यंत्रणांचे मते गालिबफ हे असे एकमेव नेते आहेत, जे इराणच्या सत्ताकेंद्रातील महत्त्वाचे निर्णय प्रभावित करू शकतात. त्यामुळे अमेरिकेला वाटते की, त्यांच्या माध्यमातून इराणमध्ये आपले धोरणात्मक हित साधता येईल. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, गालिबफ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनाही पाठवण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने दर्शवली आहे.

सुप्रीम लीडर पदासाठीही नाव चर्चेत?

काही रिपोर्टनुसार अमेरिकन प्रशासन गालिबफ यांना भविष्यात इराणच्या सुप्रीम लीडर पदासाठी योग्य मानत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेची इच्छा आहे की, सध्याच्या नेतृत्वानंतर गालिबफ यांना सर्वोच्च पदावर पाहावे. या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक विधान करत होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रणाबाबत सुप्रीम लीडरसह काम करण्याचा उल्लेख केला. मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

गालिबफ यांचा दावा, कोणतीही चर्चा नाही

अमेरिकन माध्यमांमध्ये या बातम्या वेगाने पसरल्यानंतर गालिबफ यांनी स्वतः सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा किंवा संपर्क झाला नसल्याचा दावा केला.

Web Title : क्या अमेरिका के समर्थन से ग़ालिबफ़ ईरान के सर्वोच्च नेता बनेंगे?

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, रिपोर्टों में सुझाव है कि अमेरिका संसद अध्यक्ष ग़ालिबफ़ के माध्यम से ईरान को प्रभावित करना चाहता है, संभावित रूप से उन्हें भविष्य के सर्वोच्च नेता के रूप में देख रहा है। ग़ालिबफ़ ने अमेरिकी संपर्क से इनकार किया।

Web Title : Is Ghalibaf, backed by the US, Iran's next Supreme Leader?

Web Summary : Amid US-Iran tensions, reports suggest America aims to influence Iran through Parliament Speaker Ghalibaf, potentially seeing him as a future Supreme Leader. Ghalibaf denies US contact.