शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

आकाशात रंगला खेळ...! अमेरिकेचे F-15 फायटर जेट थकले, इराणच्या ड्रोनला रोखू शकला नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:09 IST

US F15 vs Iran Drone : अमेरिकेच्या ८० मिलियन डॉलरच्या F-15 फायटर जेटला इराणच्या शाहेद ड्रोनने चकवा दिला आहे. इराकच्या एरबिलमध्ये नेमकं काय घडलं? पहा हा व्हायरल व्हिडिओ आणि ट्रम्प यांचं मोठं विधान.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता एक नवे वळण घेतले आहे. इराकच्या आकाशात अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली मानले जाणारे F-15 फायटर जेट आणि इराणचे स्वस्त शाहेद ड्रोन यांच्यात 'टॉम अँड जेरी' सारखा खेळ पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, ८० मिलियन डॉलरचे विमान एका स्वस्त ड्रोनला रोखण्यात अपयशी ठरल्याने अमेरिकेच्या संरक्षण तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अमेरिकेचे F-15 फायटर जेट इराणच्या शाहेद ड्रोनचा पाठलाग करत आहे. मात्र, इराणच्या या ड्रोनने अत्यंत चपळाईने फायटर जेटला चकवा दिला आणि इराकमधील एरबिल येथील एका ब्रिटिश ऑईल कंपनीच्या (कॅस्ट्रोल फॅसिलिटी) तळावर यशस्वीरीत्या हल्ला केला. या हल्ल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीषण आग लागली होती.

'असमतोल' हवाई युद्ध?इराण समर्थक सोशल मीडिया हँडल्सवरून हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, आता महागड्या युद्धविमानांचा काळ संपत चालला असून स्वस्त ड्रोन तंत्रज्ञान जगावर राज्य करेल. "८० मिलियन डॉलरचे फायटर जेट विरुद्ध काही हजार डॉलरचे ड्रोन आणि विजय ड्रोनचाच झाला," अशा कॅप्शनसह हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधानदरम्यान, अमेरिका-इराण युद्धाच्या ३४ व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, येत्या २ ते ३ आठवड्यांत अमेरिकन सैन्य इराणमधून बाहेर पडेल. आमचे जे उद्दिष्ट होते ते पूर्ण झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, जाण्यापूर्वी इराणवरील हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Drone Evades US Fighter Jet, Exposes Tech Gap

Web Summary : A video shows an Iranian drone outmaneuvering a US F-15 in Iraq, raising questions about American defense technology. The drone successfully struck a British oil facility after the jet failed to intercept. Trump announced US troop withdrawal from Iran soon, hinting at intensified attacks before departure.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका