डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला घाबरले? शुल्कवाढीबाबत घेतलेला 'तो' निर्णय मागे घ्यावा लागला, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:05 IST2025-03-12T15:04:05+5:302025-03-12T15:05:01+5:30
US-Canada: अमेरिका आणि कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला घाबरले? शुल्कवाढीबाबत घेतलेला 'तो' निर्णय मागे घ्यावा लागला, कारण...
US-Canada:अमेरिका आणि कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. अशातच, अमेरिकेला एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर निवडणुकीतील आश्वासनांची झपाट्याने अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु आता कॅनडाच्या बाबतीत अमेरिका मवाळ होताना दिसत आहे. कॅनडाच्या भूमिकेमुळे अमेरिकेला यू-टर्न घ्यावा लागला आहे.
ट्रम्प प्रशासनाचा यू-टर्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागाराने सांगितले की, कॅनडातून आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क दुप्पट करुन 50 टक्के करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. पण, आता ट्रम्प सरकारने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे, दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बाजारात गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.
सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीटर नवारो म्हणाले, वाढलेले यूएस टॅरिफ तुर्तास लागू केले जाणार नाहीत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या निर्णयानंतर कॅनडाच्या ओंटारियो प्रांताचे मंत्री डग फोर्ड यांनी अमेरिकेच्या वीज निर्णयातीवर लादलेले ज्यादा शुल्क तात्पुरते रोखले आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेनेही आपला ज्यादा शुल्क लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तज्ञांचे असे मत आहे की, जर कॅनडाने शुल्क चालू ठेवले, तर अमेरिका हे व्यापार युद्ध जास्त काळ चालू ठेवू शकणार नाही. त्यामुळेच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प सरकारला फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचा उलटा परिणाम होताना दिसत आहे. चीन आणि कॅनडाने प्रत्युत्तरात शुल्क लादले आहे. यामुळे अमेरिकन बाजारात सातत्याने घसरण नोंदवण्यात येत आहे.
कॅनडाच्या नव्या पंतप्रधानांचा निशाणा
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत कठोर भूमिका दाखवली आहे. कॅनडाच्या वस्तूंवर शुल्क लादण्याच्या आणि कॅनडाला 'अमेरिकेचे 51 वे राज्य' बनवण्याच्या ट्रम्प यांच्या धमक्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. कार्ने म्हणाले, आमची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आमची उत्पादने, व्यापार आणि जीवनशैलीवर अन्यायकारक शुल्क लादले आहे. हा कॅनेडियन कुटुंबांवर, कामगारांवर आणि व्यवसायांवर हल्ला आहे. पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही.