नवी दिल्ली - भारतरशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफवर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे तेव्हा ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. भारतावर लागू असलेले रिसेप्रोकल टॅरिफमध्ये कपात करून १८ टक्के करण्यात आल्याचं भारतातील अमेरिकन राजदूत सर्जिया गोर यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा हा भारताचे ऊर्जा धोरण आणि भारत-रशिया यांच्यातील मजबूत संबंध यांच्याशी निगडित असल्याने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मागील काही काळापासून भारत आणि रशिया यांच्यात तेल आणि एनर्जी क्षेत्रात भागीदारीची भूमिका राहिली आहे. या दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी कायम असते. त्यात ट्रम्प यांनी हा दावा केला. परंतु ट्रम्प यांच्या दाव्यामागे काही ठोस कारण किंवा निश्चित कालमर्यादा स्पष्ट केली नाही. मात्र यामुळे भारत आपल्या ऊर्जा धोरणात काही मोठे बदल करणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत सरकारने अद्याप रशियाकडून तेल न खरेदी करण्याबाबत आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्याची पुष्टी होऊ शकत नाही. सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. भारतातील अमेरिकन राजदूत सर्जिया गोर यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत सांगितले की, राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. लवकरच काही मोठी घोषणा होणार आहे. त्यानंतर दीड तासांनी अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कपातीची घोषणा केली.
पंतप्रधान मोदींनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादावर समाधान व्यक्त केले. त्यांनी अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटलं की, आता भारतात बनलेल्या उत्पादनावर अमेरिकेत १८ टक्क्याहून कमी टॅरिफ लागू होईल. ट्रम्प यांच्या निर्णयाचे भारतातील १४० कोटी जनतेकडून त्यांनी आभार मानले. दोन मोठ्या आर्थिक शक्ती आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशांमधील हे सहकार्य लोकांच्या फायद्याचे ठरेल. त्यामुळे नवीन संधी निर्माण होतील. जेव्हा भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करतात तेव्हा या दोन्ही देशांतील साम्यंजस्य आणि मजबूत संबंध वाढतात. त्यातून जागतिक स्थिरता आणि समृद्धी वाढते असं मोदींनी म्हटलं.
रशियाकडून भारत किती तेल आयात करतो?
२०२०-२१ या काळात रशियाकडून ०.४१९ मिलियन मेट्रिक टन भारताने आयात केले होते. हे भारतातील एकूण आयातीत १.५९ टक्के इतके होते. २०२१-२२ काळात ४ मिलियन मेट्रिक टन, २०२२-२३ मध्ये ५२ मिलियन मेट्रिक टन, २०२३-२४ या काळात ७० ते ७५ मिलियन मेट्रिक टन, २०२४-२५ या काळात ८७ मिलियन मेट्रिक टनाहून अधिक तेल भारताने रशियाकडून आयात केले आहे. हा एकूण आयातीच्या ३५.१४ टक्के हिस्सा आहे. युक्रेन युद्धापासून भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतोय. मात्र भारताच्या या व्यवहाराला अमेरिकेचा विरोध आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला होता.
Web Summary : US cut tariffs on India, but Trump claimed India will stop buying Russian oil, raising questions about energy policy and the strong Indo-Russian ties. India hasn't officially responded. Modi thanked Trump for tariff cuts, foreseeing increased US-India cooperation.
Web Summary : अमेरिका ने भारत पर टैरिफ घटाए, लेकिन ट्रम्प ने दावा किया कि भारत रूसी तेल खरीदना बंद कर देगा, जिससे ऊर्जा नीति और भारत-रूस के मजबूत संबंधों पर सवाल उठे। भारत ने आधिकारिक तौर पर जवाब नहीं दिया है। मोदी ने टैरिफ कटौती के लिए ट्रम्प को धन्यवाद दिया, और अमेरिका-भारत सहयोग बढ़ने की उम्मीद जताई।