अब्जाधीश उद्योगपतीचा भांडाफोड, '५ हजार महिलांसोबत ठेवले संबंध, बनवली होती त्यांची एक्सेल शीट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:09 IST2021-11-22T11:58:06+5:302021-11-22T12:09:05+5:30
Michael Goguen : अब्जाधीस गोगुएनच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही केस दाखल केली आहे आणि केससंबंधी कागदपत्रांमधून याचा खुलासा झाला आहे.

अब्जाधीश उद्योगपतीचा भांडाफोड, '५ हजार महिलांसोबत ठेवले संबंध, बनवली होती त्यांची एक्सेल शीट'
अमेरिकेतील (America) एक अब्जाधीश उद्योगपती मायकल गोगुएनवर (Michael Goguen) आरोप आहे की, त्याने ५ हजार महिलांची एक स्प्रेडशीट तयार करून ठेवली होती. कथितपणे गोगुएनने या महिलांसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आहे.
अब्जाधीस गोगुएनच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही केस दाखल केली आहे आणि केससंबंधी कागदपत्रांमधून याचा खुलासा झाला आहे. Michael Goguen वेंचर इन्व्हेस्टमेंट फर्म सिकोइया कॅपिटलमध्ये पार्टनर राहिला आहे आणि आता स्वत:ची कंपनी चालवतो.
धक्कादायक बाब म्हणजे याआधी मायकल गोगुएनवर लैंगिक शोषणाचेही आरोप लागले आहेत. Michael Goguen विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहेत. तर त्याचं वय ५७ वर्ष आहे.
५७ वर्षीय Michael Goguen विरोधात त्याच्या चार माजी कर्मचाऱ्यांनी केस केली आहे. ते म्हणाले की, मायकलने कथितपणे आपल्या 'हरम'ची देखरेख करण्यासाठी त्यांच्याकडून मदत मागितली होती. 'हरम' त्या ठिकाणाला म्हणतात जिथे एक किंवा एकापेक्षा जास्त महिला किंवा पत्नी राहतात.
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, माजी कर्मचाऱ्यांनी आरोप लावले की, तो अनेक आलिशान आणि गुप्त घरांचा मालक आहे. याच घरांमध्ये तो तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जात होता. त्याच्या माजी कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, त्याच्या बारच्या बेसमेंटमध्ये एक बूमबूम रूमही आहे. ज्यात एक स्ट्रिपर पोल आहे.
या केसनुसार मॅथ्यू मार्शल नावाच्या एका माजी कर्मचाऱ्याने दावा केला आहे की गोगुएनने त्याला त्याचा मित्र ब्रायन नॅशचा मर्डर करण्यासाठी सांगितलं होतं. कारण ब्रायनला गोगुएनबाबत काहीतरी माहीत होतं. त्याआधी त्याची एक्स गर्लफ्रेन्ड एम्बर बॅप्टिस्ट ने त्याच्यावर २०१६ साली सतत लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.
गोगुएनच्या अमीनटोर ग्रुप एलएलसीच्या माजी कर्मचाऱ्यानेही त्याच्या विरोधात केस केली होती. आरोप लावण्यात आला होता की, त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडे त्याचं अफेअर लपवण्यासाठी मदत मागितली होती. तेच एका महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या बॉसने तिला १२०० डॉलर देण्याआधी कोकेन आणि दारू पाजली. त्यानंतर तिचं लैंगिक शोषण केलं.