शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

America on PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनीही या दौऱ्यावर बोचरी प्रतिक्रिया दिली होती. "भारत-अमेरिकेचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक सखोल आहेत, पण भारताने या मैत्रीला हलक्यात घेऊ नये," असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "अमेरिकन राजदूताला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. साहजिकच आमची मते वेगळी आहेत. पण, इतर देशांप्रमाणेच भारतही आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेला महत्त्व देतो. अमेरिकेसोबतची आमची जागतिक धोरणात्मक भागीदारी, आम्हाला इतर काही मुद्द्यांवर मतभेदाचा आदर करण्याची संधी देते. भारत आणि अमेरिका परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर नियमितपणे चर्चा करतात. पण, राजकीय गोष्टींवर चर्चा करण्याची आमची परंपरा नाही," अशी स्पष्टोक्ती जैस्वाल यांनी दिली.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय म्हणालेपत्रकार परिषदेदरम्यान रणधीर जैस्वाल यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची आम्हाला माहिती आहे. ही बातमी आल्यानंतर काही तासांतच पंतप्रधानांनी या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि घटनेचा तीव्र निषेध केला. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. अमेरिका ही आमचा सहकारी लोकशाही देश आहे आणि आम्हाला त्यांचेही कल्याण हवे आहे."

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेला मिरची झोंबलीपंतप्रधान मोदी 8 ते 10 जुलै दरम्यान रशिया दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे पाश्चात्य देशांना मिरची झोंबलीये. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा अमेरिकेला आवडलेला नाही. त्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कठोर टिप्पणी केली आहे. पीएम मोदींचा दौरा नाटो बैठकीदरम्यान होत असल्याने अमेरिकाही संतापली होती. याबाबत अमेरिकेचे राजदूत गार्सेटी दिल्लीतील संरक्षण परिषदेत म्हणाले होते की, "भारताने अमेरिकेची मैत्री गृहीत धरू नये. मला माहिती आहे की, भारताला आपली धोरणात्मक स्वायत्तता आवडते, पण संघर्षाच्या काळात धोरणात्मक स्वायत्तता असे काही नसते. संकटाच्या वेळी आपण एकमेकांच्या बाजूने असायला हवे. केवळ शांततेसाठी उभे राहून चालणार नाही, तर शांततेशी खेळ करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे." अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनीही भारताला रशियाविरोधात इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, "जर काही संघर्ष झाला, तर रशिया भारतापेक्षा चीनला प्राधान्य देईल." 

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन