शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

35 वर्षांनी सापडला हवाई दलाच्या कर्तव्याला कंटाळून पळून जाणारा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:38 PM

1983 साली नेदरलॅंडमधील कर्तव्य बजावल्यावर हा अधिकारी गायब झाला होता.

वॉशिंग्टन- 1983 साली अमेरिकेच्या हवाई दलातील नोकरी कोणालाही न सांगता सोडून गायब होणाऱ्या अधिकाऱ्यास पकड़ण्यात अमेरिकन तपास यंत्रणांना यश आले आहे. आपल्याला नैराश्य आल्यामुळे हवाई दलाची नोकरी सोडली होती असं या अधिकाऱ्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.विल्यम हॉवर्ड ह्युजेस ज्युनियर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमेरिकेच्या हवाई दलामध्ये तो कार्यरत होता. मात्र आता अटक होताना मात्र एका बनावट पासपोर्ट प्रकरणामुळे तो विशेष तपासणी पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका पासपोर्ट प्रकरणात चौकशी करताना विल्यमची ओळख पटली व त्याला अटक झाली.

विल्यम ह्युजेसने नोकरी सोडल्यानंतर तो बॅरी ओ बेईर्न या नावाने राहात होता. हवाई दलात काम करताना नैराश्य आले म्हणून त्याने नोकरी सोडली व खोट्या ओळखीने तो वावरु लागला. नोकरी सोडून कॅलिफोर्नियात स्थायिक झाल्याचे त्याने चौकशीमध्ये स्पष्ट केले आहे. तो आता 66 वर्षांचा आहे.1983 साली त्याला नेदरलँडसमध्ये नाटोच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करण्यास सांगितले होते. तेथून परत आल्यावर त्याने नोकरीला रामराम केला आणि तो पसार झाला. तो न्यू मेक्सिको, अल्बुकर्क येथे 19 विविध ठिकाणांहून 28,500 डॉलर्स इतकी रक्कम काढताना शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्याची काहीच माहिती उपलब्ध झाली नाही. तो गायब झाल्यामुळे त्याला सोव्हीएट युनियन (रशिया) च्या एजंटसनी पळवले असावे अशी शंका सुरुवातीस घेतली गेली होती. त्याच्याकडे विशेष अशी कोणतीही महत्त्वाची माहिती नसल्याचे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :USअमेरिकाairforceहवाईदलcrimeगुन्हे