ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 15:34 IST2018-01-24T15:12:05+5:302018-01-24T15:34:05+5:30

अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता.

United states drone strike on Pakistan | ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

ठळक मुद्देपाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याबद्दलही अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली होती. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने दहशतवाद्यांचा बंदोबस्त करु असे अमेरिकेने म्हटले होते.  

इस्लामाबाद - अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने दहशतवाद्यांचा बंदोबस्त करु असे अमेरिकेने म्हटले होते.  

पाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याबद्दलही अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली होती. अमेरिकेने पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ला केला आहे. यात हक्कानी नेटवर्कचे दोन कमांडर ठार झाले आहेत. अमेरिकेची ही कारवाई पाकिस्तानसाठी एक ठोस संदेश आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा देणारे टि्वट केले होते. पाकिस्ताननं आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे. 

मात्र यापुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही. अमेरिकेनं पाकिस्तानला 2002पासून आतापर्यंत जवळपास 33 अब्ज डॉलर एवढी आर्थिक मदत केली आहे. तर ऑगस्ट 2017मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला देण्यात येणा-या 255 मिलियन डॉलरच्या मदतीवरही टाच आणली होती.                                                                                                                                                                                   

Web Title: United states drone strike on Pakistan