विमानात बसल्यानंतर प्रवाशांना लागली झोप, डोळे उघडले तर पोहोचले दुसऱ्याच देशात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 03:44 PM2024-01-23T15:44:30+5:302024-01-23T15:45:18+5:30

सोमवारी रात्री आयर्लंड आणि यूकेमधून प्रवास करणाऱ्यांसाठी विमान प्रवास अडचणीचा ठरला

united kingdom britain ireland storm isha sevral flight affected diversions cancellations passengers face problems | विमानात बसल्यानंतर प्रवाशांना लागली झोप, डोळे उघडले तर पोहोचले दुसऱ्याच देशात...

विमानात बसल्यानंतर प्रवाशांना लागली झोप, डोळे उघडले तर पोहोचले दुसऱ्याच देशात...

Isha storm in Ireland UK : ईशा नावाच्या वादळाने ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये कहर केला आहे. या वादळामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. अनेक सेवा रद्द करण्यात आल्या असून हवाई वाहतुकीवरही वाईट परिणाम झाला आहे. ईशा वादळामुळे पश्चिम युरोपमध्ये उड्डाणे प्रभावित होत आहेत. डझनभर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर अनेक उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तशातच सोमवारी रात्री आयर्लंड आणि यूकेमधून प्रवास करणाऱ्यांसाठी विमान प्रवास अडचणीचा ठरला. विमानात बसलेल्या प्रवाशांसाठी हा एक विचित्र विमान प्रवास ठरला, जो ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. वातावरणाचा असाही परिणाम झाला की अनेक लोक आपल्या गंतव्यस्थानी किंवा आपल्या देशातही उतरू शकले नाहीत.

आयर्लंड आणि ब्रिटनमधील विमानतळांवर या वादळाचा फार वाईट परिणाम झाला होता. त्या दरम्यान धावपट्टीवर ताशी ९० मैल वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पश्चिमेकडे जाणारी अनेक विमाने युरोपमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आली. अशा स्थितीत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचता न आल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

विमानाने कॅनरी बेटांमधील लॅन्झारोटे येथून डब्लिनकडे उड्डाण केले. त्यादरम्यान विमान आयरिश राजधानीच्या जवळ आले, परंतु मागे वळून उतरण्याचा प्रयत्न न करता फ्रान्सच्या बोर्डोकडे वळले. आणखी एक रायनएअर फ्लाइट मँचेस्टरहून डब्लिनला टेक ऑफ करणार होते, परंतु होल्डिंग पॅटर्नजवळ फिरल्यानंतर, डब्लिनमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला परंतु ते होऊ शकले नाही, त्यानंतर ते पॅरिस ब्यूवेसकडे वळले. जे फ्लाइट अर्धा तास घेणार होते त्याला अडीच तास लागले. त्याचप्रमाणे इतर अनेक उड्डाणे त्यांच्या गंतव्यस्थानी उतरू शकली नाहीत.

उड्डाण रद्द होणे आणि योग्य स्थळी पोहोचू न शकणे याचा परिणाम सोमवारी दिसून आला. वादळाचा फटका बसलेल्या प्रवाशांसाठी अतिरिक्त पार्किंग शुल्क माफ केले जाईल अशी घोषणा करताना डब्लिनमध्ये २९ तिकिटे रद्द करण्यात आली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना या काळात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ईशा वादळामुळे ब्रिटन आणि आयर्लंडमधील वीज व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी अपघातही झाले आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमीही झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

 

Web Title: united kingdom britain ireland storm isha sevral flight affected diversions cancellations passengers face problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.