शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 08:09 IST

India America Interim Trade Agreement Framework: भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार करारासाठी एक फ्रेमवर्क जारी केले आहे.

India America Interim Trade Agreement Framework: भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार कराराबाबत एक आराखडा जारी केला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेमधील व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यास गती मिळणार आहे. विस्तारित वाटाघाटी आणि अलीकडील टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम व्यापार करारातील आराखडा जारी केल्याने  दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना नवीन आयाम मिळाल्याचे म्हटले जात आहे. 

भारत आणि अमेरिका या आराखड्यामधील तरतुदींची लवकरच अंमलबजावणी करतील. शक्य तितक्या लवकर परस्पर द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्यावर भर देतील, असे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक तसेच परस्पर संबंधातील एक मैलाचा दगड ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून याबाबत सविस्तर माहिती दिली. 

शेती, दूध उत्पादन क्षेत्रावर कोणताही परिणाम नाही

पीयूष गोयल यांनी अमेरिकेसोबतच्या अंतरिम व्यापार कराराचा आराखडा जाहीर करताना एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने अमेरिकेसोबतच्या अंतरिम व्यापार करारासाठी एक मजबूत आराखडा तयार केला आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी, विशेषतः एमएसएमई, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी ३० ट्रिलियन डॉलर्सच्या मोठ्या बाजारपेठेचे दरवाजे खुले होणार आहेत. निर्यातीतील वाढीमुळे महिला आणि तरुणांसाठी लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

या आराखड्यानुसार, अमेरिका भारतीय वस्तूंवरील परस्पर कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. कापड आणि वस्त्रे, चामडे आणि पादत्राणे, प्लास्टिक आणि रबर उत्पादने, सेंद्रिय रसायने, गृह सजावट, हस्तकला आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील निवडक यंत्रसामग्री यासारख्या प्रमुख क्षेत्रातील भारतीय उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच जेनेरिक फार्मास्युटिकल्स, रत्ने आणि हिरे आणि विमानांच्या सुट्या भागांसह अनेक वस्तूंवरील कर शून्यावर आणले जातील. यामुळे भारताची निर्यात स्पर्धात्मकता आणि मेक इन इंडिया आणखी मजबूत होईल, असे गोयल यांनी सांगितले. 

हा करार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा

हा करार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि ग्रामीण उपजीविका टिकवून ठेवणे, याबाबत भारताच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. मका, गहू, तांदूळ, सोया, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल (इंधन), तंबाखू, काही भाज्या आणि मांस यासारख्या संवेदनशील कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांना पूर्णपणे संरक्षण दिले आहे. हा करार भारत आणि अमेरिकेला आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या सामायिक संकल्पाने पुढे जाण्यास मदत करेल. जेणेकरून नागरिकांसाठी आणि व्यवसायांसाठी शाश्वत वाढीचा राजमार्ग खुला होऊ शकेल, असे गोयल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अमेरिका आणि भारत यांच्यात एक करार झाला आहे ज्याअंतर्गत अमेरिका भारतीय वस्तूंवरील कर ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. ट्रम्प यांनी दावा केला की, त्या बदल्यात भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल आणि त्यांचे व्यापार अडथळे कमी करेल. भारत आता अमेरिकेकडून आणि कदाचित व्हेनेझुएलाकडूनही तेल खरेदी करण्यास सुरुवात करेल. ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लादलेला २५ टक्के दंडात्मक कर पूर्णपणे काढून टाकण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : India-US interim trade deal framework boosts exports, protects farmers.

Web Summary : India and US interim trade agreement framework aims to boost exports, especially for MSMEs and farmers. Sensitive agricultural products are protected. The deal promises new jobs and economic growth for both nations, lowering tariffs on various Indian goods.
टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयल