बुधवारी झालं होतं लग्न, रविवारी सुटकेसमध्ये सापडली नवरीची बॉडी, पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:01 IST2021-11-02T12:59:36+5:302021-11-02T13:01:52+5:30
डॉनच्या हत्येने तिच्या मित्रांना धक्का बसला आहे. एका मित्राने सांगितलं की, डॉन फारच मनमिळावू आणि दिलदार होती. काही दिवसांआधी तिने एका दिव्यांग व्यक्तीची मदत केली होती.

बुधवारी झालं होतं लग्न, रविवारी सुटकेसमध्ये सापडली नवरीची बॉडी, पतीला अटक
ब्रिटनमध्ये एका महिलेची लग्नाच्या चार दिवसानंतरच हत्या झाली. महिलेचा मृतदेह पोलिसांना सुटकेसमध्ये सापडला. या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. असं मानलं जात आहे की, त्यानेच आपल्या पत्नीची हत्या करत तिचा मृतदेह घरापासून दूर सुटकेसमध्ये फेकला.
‘डेली स्टार’ च्या रिपोर्टनुसार, डॉन वॉकर नावाच्या महिलेने गेल्या बुधवारी लग्न केलं होतं आणि रविवारी तिचा मृतदेह ब्रिगहाऊसजळ लाइटक्लिफच्या एसगर्थ एवेन्यू भागात एका सुटकेसमध्ये आढळून आला. पोलिसांना संशय आहे की, महिलेच्या ४५ वर्षीय पतीने हत्याकांड घडवलं. पण त्याच्या विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत.
डॉनच्या हत्येने तिच्या मित्रांना धक्का बसला आहे. एका मित्राने सांगितलं की, डॉन फारच मनमिळावू आणि दिलदार होती. काही दिवसांआधी तिने एका दिव्यांग व्यक्तीची मदत केली होती. त्याच्याकडे शॉपिंगसाठी पैसे कमी पडले होते. मित्र म्हणाले की आम्हाला विश्वास बसत नाहीये की, अशा महिलेची कुणी हत्या कशी करू शकतो.
पोलिसांना एका व्यक्तीने फोन करत या घटनेची माहिती दिली होती. पण त्याने त्याची ओळख सांगितली नाही. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, त्यांना माहिती देणारा कोण होता आणि काय त्याने हत्या होताना पाहिलं? एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आम्ही प्रत्येक बाजूने विचार करत आहोत. महिलेच्या पतीवर सर्वात जास्त संशय आहे. पण तसे काही पुरावे अजून सापडले नाहीत'.