होर्मुझ स्ट्रेटबाबत संयुक्त राष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या बाजूने आलेल्या एका प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान टाळले आहे. ज्यातून बहरीनला मोठा झटका लागला. चीन, रशिया आणि फ्रान्स यांच्या खेळीने हा प्रस्ताव रखडला ज्यातून अमेरिकेचं प्लॅनिंग मध्येच फिस्कटलं.
होर्मुझ स्ट्रेट सुरक्षेच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होणार होते, परंतु ते मतदान टाळण्यात आले. हा प्रस्ताव बहरीनकडून आणला होता. ज्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असल्याचे कारण देत अधिकृतपणे मतदान टाळण्यात आले. परंतु मतदान टाळण्याचे मुख्य कारण यामागे असणाऱ्या बड्या शक्तींच्या खेळीमुळे झाल्याचं बोलले जाते. विशेषत: चीन, रशिया आणि फ्रान्सने घेतलेल्या आक्षेपामुळे हा प्रस्ताव पुढे जाण्यापासून रोखला आहे.
काय होता प्रस्ताव?
ठरावाच्या मसुद्यानुसार सदस्य राष्ट्रांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांचे संरक्षण करण्यासाठी "आवश्यक बचावात्मक शक्ती" वापरावी असे आवाहन करण्यात आले होते. तसेच देश एकट्याने किंवा बहुराष्ट्रीय नौदल आघाडीचा भाग म्हणून कारवाई करू शकतील अशीही तरतूद त्यात होती. त्याचा उद्देश इराणचे होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा आणण्याचे प्रयत्न रोखणे आणि जागतिक सागरी व्यापाराचे संरक्षण करणे हा होता.
प्रस्ताव कुठे अडकला?
हा प्रस्ताव पारित करणे सोपे नव्हते. चीन आणि रशियाने स्पष्ट शब्दात या प्रस्तावाला विरोध केला होता. अशाप्रकारच्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं चिनी राजदूतांनी सांगितले. रशिया, जो इराणचा सहकारी देश आहे त्याने एकतर्फी कारवाई करण्याच्या या प्रस्तावावर टीकास्त्र सोडले. फ्रान्सनेही या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली. कोणतीही कारवाई पूर्णपणे 'संरक्षणात्मक' असावी आणि लष्करी हस्तक्षेप टाळला जावा असं फ्रान्सने इच्छा व्यक्त केली.
अमेरिका आणि बहरीनला धक्का
या प्रस्तावाबाबत अमेरिका आणि बहरीन खूप सक्रीय होते. बहरीनचे राजदूत जमाल अल रोवाई यांनी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पाहता कारवाई गरजेची आहे असं बहरीनने म्हटलं. त्यात आता मतदान टाळल्याने सुरक्षा परिषदेत या प्रस्ताववर सहमती बनवणे कठीण असल्याचं दिसून येते. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असून यामधून जागतिक तेल आणि एलएनजी पुरवठ्यापैकी अंदाजे २०% वाहतूक होते. इराणने या सागरी मार्गावर घातलेल्या नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे आणि तेल व वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Web Summary : A US-backed proposal on Hormuz Strait security was stalled at the UN due to objections from China, Russia, and France. The proposal sought to protect ships and counter Iranian interference, but concerns over escalation led to its postponement, dealing a blow to US and Bahraini efforts.
Web Summary : हर्मुज जलडमरूमध्य सुरक्षा पर अमेरिका समर्थित प्रस्ताव संयुक्त राष्ट्र में चीन, रूस और फ्रांस के विरोध के कारण रुक गया। प्रस्ताव का उद्देश्य जहाजों की रक्षा करना और ईरानी हस्तक्षेप का मुकाबला करना था, लेकिन तनाव बढ़ने की आशंकाओं के कारण इसे स्थगित कर दिया गया, जिससे अमेरिका और बहरीन के प्रयासों को झटका लगा।