शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:52 IST

विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

वॉशिंग्टन - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता ३ वर्ष होत आली मात्र अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यात अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात ऑन कॅमेरा झालेल्या शा‍ब्दिक संघर्षाने जगाला हैराण केले आहे. हा वाद इतका विकोपाला पोहचला की झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून निघून जाण्यास सांगितले. ट्रम्प यांनी दोन्ही देशातील चर्चा बंद केली. 

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या चर्चेनंतर ते माध्यमांशी संवाद साधणार होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मिनरल डिल करारावर चर्चा होणार होती, परंतु मध्येच चर्चा थांबली. राष्ट्रपती ट्रम्प यांनी आधीचे राष्ट्रपती ज्यो बायडन प्रशासनाने युक्रेनला दिलेल्या आर्थिक आणि सैन्य मदतीची भरपाई मागितली. अमेरिकेला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न मिळावं अशी त्यांची इच्छा होती. ट्रम्प यांनी अनेकदा अमेरिकेच्या सपोर्ट बदल्यात ५०० अब्ज डॉलर मिळाले पाहिजेत असं विधान केले. परंतु ३५० अब्ज डॉलरवर चर्चा फायनल होणार होती, परंतु त्या बदल्यात युक्रेनला काहीच मिळणार नाही, सुरक्षा बिल्कुल नाही अशी अट ठेवण्यात आली.

सुरक्षा चर्चेवर ट्रम्प यांनी दिला नकार

विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प स्वत: झेलेन्स्की यांच्या स्वागतासाठी बाहेरच्या दरवाजापर्यंत आले. दोन्ही नेत्यांचे चांगले फोटोसेशन झाले. त्यानंतर ट्रम्प, झेलेन्स्की आणि त्यांच्या कॅबिनेटसह एकत्र पत्रकार परिषदेत बसले होते. त्यावेळी एका पत्रकाराने युक्रेनच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला तेव्हा आम्ही या मुद्द्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला आता सुरक्षेबाबत काही बोलायचं नाही, फक्त डील व्हायला हवी. मला सुरक्षेची काही चिंता नाही. युरोप त्यांची माणसं तिथे पाठवेल, फ्रान्स, ब्रिटन आणि अन्य देश त्यांना सुरक्षा देतील हे मला माहिती आहे. आम्ही सुरक्षेसाठी कटिबद्ध नाही परंतु आम्ही याबाबत विचार करू शकतो. आम्ही वेगळ्या प्रकारे सुरक्षा देऊ शकतो, आमचे कर्मचारी तिथे असतील, ते डिगिंग करून खनिजे आणतील आणि आम्ही त्या देशात काही चांगले उत्पादन करू असं ट्रम्प यांनी म्हटलं.

दरम्यान, पत्रकाराच्या प्रश्नावर झेलेन्स्की यांनीही प्रतिक्रिया दिली. जर सुरक्षा गॅरंटीची बाब असेल, जर सीजफायरवर बोलायचं असेल तर आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही कारण त्याचा फायदा झाला नाही. पुतिन यांनी २५ वेळा सीजफायरचं उल्लंघन केले आहे जेव्हा २०१६ मध्ये ट्रम्प राष्ट्रपती होते. त्यामुळे सीजफायरवर आम्ही चर्चा करू शकत नाही. केवळ युद्धबंदीच्या प्रस्तावावर ट्रम्प यांना विश्वास असेल परंतु कागदपत्रे नाही तर एक मजबूत सैन्याची आवश्यकता आहे. आम्ही जेव्हा मजबूत होऊ तेव्हाच पुतिनचे सैन्य आमच्या सैन्याला घाबरेल. जर पुतिन यांना रोखले नाही तर ते कुठल्या अन्य देशांवर आक्रमण करतील. मग ते पोलँडही असेल कारण ते नाटोचे सदस्य आहेत. मग त्या स्थितीत अमेरिकेचे सैन्यही लढत राहील असं झेलेन्स्कीने स्पष्ट सांगितले.

ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात शा‍ब्दिक सामना

झेलेन्स्की यांच्या विधानावर ट्रम्प इतके नाराज झाले आणि ते म्हणाले की, तुम्हाला सीजफायर नको आहे आणि तुम्ही तुमच्या माणसांना मरायला देत आहात. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळत आहात. तिसऱ्या महायुद्धाचा हा जुगार आहे. तुम्ही जे करताय ते देशासाठी अपमानजनक आहे असं त्यांनी म्हटलं. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिका