शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

UAE मध्ये 5 भारतीयांना जॅकपॉट; एका भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:59 IST

UAE Lottery Winner: केरळ आणि मुंबईचे रहिवासी युएईमध्ये लखपती-करोडपती झाले आहेत.

UAE Lottery Winner: भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक चांगल्या नोकरीसाठी दुबई आणि यूएईमध्ये जातात. यातील अनेकजण यूएईमधील लॉटरी जिंकून प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. या वर्षीही पाच भारतीयांनी लॉटरी जिंकली आहे. यातील एकाने तर सुमारे 45 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. 

5 भारतीयांचे नशीब उजळलेसंयुक्त अरब अमिराती (UAE) च्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाच भारतीयांचे लकी ड्रॉ मध्ये नाव आले आहे किंवा लॉटरी जिंकली आहे. या लोकांपैकी एक नियंत्रण कक्ष ऑपरेटर आहे, ज्याने AED 20,000,000 ची लॉटरी जिंकली आहे. ही रक्कम भारतीय चलनात अंदाजे 45 कोटी रुपये आहे. श्रीजू, असे या व्यक्तीचे नाव असून, तो केरळचा रहिवासी आहे. UAE च्या 'महजूज सॅटर्डे मिलियन्स' लॉटरीमध्ये त्याने पहिले पारितोषिक जिंकले आहे.

बुधवारी ड्रॉ जाहीर झाला बुधवारी 154 वी सोडत जाहीर करण्यात आली, त्यात श्रीजूने सुमारे 45 कोटी रुपये जिंकले. केरळचा रहिवासी असलेला 39 वर्षीय श्रीजू, गेल्या 11 वर्षांपासून यूएईच्या फुजैराह येथे काम करतो. तो कामावर होता, तेव्हा त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. श्रीजू आता या पैशातून भारतात एक मोठे घर घेण्याच्या विचारात आहे. 

एकाने 11 लाख तर दुसऱ्याने 16 लाख रुपये जिंकले'गल्फ न्यूज'नुसार, गेल्या शनिवारी 'एमिरेट्स ड्रॉ फास्ट5'मध्ये आणखी एका केरळच्या रहिवाशाने सुमारे 11 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. याआधी 9 नोव्हेंबरला मुंबईतील 42 वर्षीय मनोज भावसार यांनी फास्ट 5 लॉटरीत सुमारे 16 लाख रुपये जिंकले होते. तसेच, 8 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित 'दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलेनियर' प्रमोशनमध्ये अनिल ग्यानचंदानी यांनी 1 मिलियन यूएस डॉलर्स जिंकले होते.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीMONEYपैसाIndiaभारतDubaiदुबईInternationalआंतरराष्ट्रीय