शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

या शहरात सापडले अडीचशे किलोचे बॉम्ब, घाबरलेल्या लोकांनी घरदार सोडून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 4:07 PM

बॉम्ब सापडल्याचे वृत्त शहरात पसरताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळू लागले. 

बर्लिन - दुसरे महायुद्ध संपून जवळपास 75 वर्षे होत आली आहेत. मात्र या युद्धाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या अनेक खाणाखुणा अजूनही युरोपमध्ये दिसून येतात. दरम्यान, जर्मनीमधील डॉर्टमुंड शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेला भलामोठा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. बॉम्ब सापडल्याचे वृत्त शहरात पसरताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळू लागले. जर्ममीच्या पश्चिम भागात असलेल्या डॉर्टमुंट येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चार बॉम्ब सापडले आहेत. यापैकी प्रत्येक बॉम्बचे वजन सुमारे 250 किलो आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्याचे वृत्त समजताच सुरक्षा यंत्रणांनी हे बॉम्ब ताब्यात घेऊन ते निष्क्रिय केले. 

मात्र हे बॉम्ब सापडल्याची वार्ता डॉर्टमुंड शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. चार महाकाय बॉम्ब सापडल्याचे कळाल्याने लोक जीव वाचवण्यासाठी शहर सोडून पळू लागले. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तसेच वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली. एकीकडे बॉम्ब सापडल्याची भीती असतानाचा हे बॉम्ब पाहण्याच्या कुतुहलापोटी घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. मात्र या गर्दीला हटवताना सुरक्षा दलांच्या नाकी नऊ येत असतात. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महायुद्धाला 75 वर्षे उलटून गेल्यानंतरही जर्मनीमध्ये सातत्याने युद्धकाळात वापरले न गेलेले बॉम्ब आणि अन्य स्फोटक सामुग्री सापडत असते.  

टॅग्स :Bombsस्फोटकेGermanyजर्मनी