Two dead & several injured as police lathicharged protesters in Muzaffarabad | पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

मुझफ्फराबाद -  पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. आज पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे ऑल इंडिपेंडेंट पार्टीज अलायन्स (एआयपीए) च्या झेंड्याखाली अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एका सभेचे आयोजन केले होते. या दरम्यान तिथे आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीमार केला. या लाठीमारात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. 

 या संदर्भातील एक व्हिडीओ प्रसारित झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर अफरातफर माजल्याचे दिसत आहे. लाठीमारापासून वाचण्यासाठी लोक इकडून तिकडे पळत असल्याचे दिसत आहेत. तसेच काही लोक तोंडावर फडके बांधून राजकीय पक्षांचा विरोध करताना दिसत आहेत. 

भारताच्या विरोधात पाकिस्तान रचतोय मोठा कट! LoCवर पाठवले रणगाडे, सैनिक तैनात

नवी दिल्लीः काश्मीर मुद्द्यावरून सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ रणगाडे पाठवले आहेत. तसेच आपल्या स्पेशल फोर्सच्या 100 कमांडोंनादेखील तैनात केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधात मोठी कारवाई करण्याच्या विचारात तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला भारतीय लष्कर उत्तर देण्यास समर्थ असल्याचं लष्करानं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं गुजरातल्या नियंत्रण रेषेजवळील स्वतःच्या भागात एसएसजी कमांडो तैनात केले होते. इक्बाल-बाजवा पोस्टवर पाक कमांडो ठेवले होते. कलम 370 जम्मू-काश्मीरमधून हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकत सुटला आहे. तसेच नियंत्रण रेषेवरही वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत.

भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली होती. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला होता. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला होता.

  • पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two dead & several injured as police lathicharged protesters in Muzaffarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.