Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:47 PM2021-05-22T23:47:09+5:302021-05-22T23:47:49+5:30

Corona Virus new Indian strain: ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण थोडे वाढले आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच तिथे दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे करण्यात आले आहे. 

Two Covishield vaccine doses needed against Indian B.1.617.2 variant; UK report | Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा

Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा

Next

Covishield: कोरोनाच्या भारतीय व्हेरिअंटविरोधात (Corona New Variant) ऑक्सफर्ड, अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा एकच डोस कमी प्रभावी असल्याचे समोर येत आहे. युके सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आकडे याकडे इशारा करत आहेत. त्यांच्या संशोधनानुसार कथितरित्या भारतात सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरिअंटपासून सुरक्षा देण्यास कोरोना लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. (Two Covishield vaccine doses needed for strong protection against B.1.617.2 variant found in India: Report)


पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) च्या आकड्यांनुसार भारतात सापडलेल्या B.1.617.2 व्हेरिअंटविरोधात कोव्हिशिल्ड (ब्रिटनची लस) कोरोना लसीच्या दोन डोसनी 81 टक्के सुरक्षा प्रदान केली. तर दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या B.1.1.7 व्हेरिअंटविरोधात 87 टक्के सुरक्षा दिली. 
या आकडेवारीनुसार कोरोना लसीचा एक डोस B.1.617.2 व्हेरिअंटविरोधात केवळ 33 टक्केच परिणामकारक ठरला आहे. तर B.1.1.7 व्हेरिअंटविरोधात 51 टक्के परिणामकारक ठरला आहे. फायनान्शिअल टाईम्सनुसार कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस B.1.1.7 व्हेरिअंटच्या तुलनेत B.1.617.2 वर 35 टक्के कमी सुरक्षा प्रदान करतो. 


PHE ने बायोएनटेक/फाइजर आणि ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लसींच्या  माहितीचा अभ्यास केला आहे. यामध्ये ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाचे दोन डोस 85 ते 90 टक्के परिणामकारक आहेत. ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टीट्य़ट कडून केले जाते. यामुळे या लसीचा परिणाम भारतात सापडलेल्या कोरोना स्ट्रेनवर तेवढाच आहे. 


ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण थोडे वाढले आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच तिथे दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे करण्यात आले आहे. 

Web Title: Two Covishield vaccine doses needed against Indian B.1.617.2 variant; UK report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.