दोन मोठी सौरवादळे पृथ्वीवर धडकली
By Admin | Updated: September 14, 2014 02:41 IST2014-09-14T02:41:12+5:302014-09-14T02:41:12+5:30
सूर्याने या आठवडय़ाच्या सुरुवातीला विद्युतभारीत प्लाङमाच्या दोन महाकाय लहरी आपल्या दिशेने पाठविल्या.

दोन मोठी सौरवादळे पृथ्वीवर धडकली
वॉशिंग्टन : सूर्याने या आठवडय़ाच्या सुरुवातीला विद्युतभारीत प्लाङमाच्या दोन महाकाय लहरी आपल्या दिशेने पाठविल्या. त्या गुरुवारी व शुक्रवारी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रवर धडकून शक्तिशाली भूचुंबकीय वादळ निर्माण झाले. या वादळामुळे जगभरातील विद्युत पुरवठा, जीपीएस व रेडिओप्रणाली विस्कळीत होऊ शकते. आताची ही सौरवादळे फारसे नुकसान करणारी नसली तरी यापुढील असू शकतात. सुदैवाने ही सौरवादळे विध्वंसक वाटत नाहीत आणि उत्तर अमेरिका आणि कॅनडात राहणा:यांना शुक्रवारी व शनिवारी रात्री रंगीत धुव्रीय प्रकाश दिसू शकतो. आताची सौरवादळे विध्वंसक वाटत नसली तरी सूर्याचा अधूनमधून होणारा उद्रेक पृथ्वीवर हाहाकार घडवून आणू शकतो याची ती आठवण करून देतात. आतापेक्षा अधिक शक्तिशाली सौरवादळ पृथ्वीवर धडकले तर ते उत्तर अमेरिकेतील विद्युत पुरवठा ठप्प पाडून लाखो घरांना अनेक महिने अंधारात लोटू शकते व त्यामुळे प्रचंड गदारोळ माजू शकतो, असा इशारा अंतराळ तज्ज्ञांनी दिला आहे. यापूर्वी 1859 मध्ये मोठे सौरवादळ पृथ्वीवर धडकले होते; मात्र तेव्हा वीज मनोरे नव्हते. केवळ टेलीग्राफ वायरची हानी झाली होती. त्यानंतर 2क्12 मध्ये आम्ही अशाच एका शक्तिशाली सौरवादळाच्या तडाख्यापासून थोडक्यात बचावलो होतो. (वृत्तसंस्था)
4आताचे सौर उद्रेक तुलनेने सौम्य आहेत; मात्र एवढय़ा कमी अंतराने एकापाठोपाठ दोन उद्रेक होणो ही असामान्य बाब आहे. या आठवडय़ाच्या 9 व 1क् सप्टेंबर रोजी दोन सौरज्वाळांचा उद्रेक होऊन सक्रिय सौरडाग क्षेत्र निर्माण झाले. यातील दुसरी ज्वाळा विशाल होती. या ज्वाळांनी दोन विद्युतभारीत लहरी पृथ्वीच्या दिशेने पाठवल्या. यातील एक शुक्रवारी रात्री पृथ्वीवर पोहोचून जी 2 स्तराचे भूचुंबकीय वादळ निर्माण झाले.
4भूचुंबकीय वादळे जी 1 पासून जी 5 र्पयतच्या पातळीची असतात. यातील जी 5 ही सर्वात मोठी पातळी आहे. दुसरा उद्रेक शुक्रवारी धडकला आणि त्यातून जी 3 पातळीचे भूचुंबकीय वादळ निर्माण झाले.