शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 08:21 IST

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना काही ट्विट्सला फ्लॅग करत फॅक्ट-चेकचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे"ट्विटर आता 2020च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही हस्तक्षेप करीत आहे.""ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे हल्ला करत आहे. मी राष्ट्रपती म्हणून हे होऊ देणार नाही."

वॉशिंग्टन : जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका कोरोनापुढे मात्र हतबल झाल्याची पाहायला मिळत आहे. यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. यातच आता सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. 

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना काही ट्विट्सला फ्लॅग करत फॅक्ट-चेकचा इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी  बोलण्याच्या स्वातंत्र्याविरूद्ध असल्याचे सांगितले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दोन ट्विट्सवरून ट्विटरने त्यांना इशारा दिला. मेल-इन बॅलेट्सला बनावट आणि 'मेल बॉक्स लुटला जाईल' असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत अकाऊंटवर केले होते. या ट्विटवर एक लिंक येत आहे, त्यावर लिहिलेले, मेल-इन बॅलेट्सविषयी तथ्य जाणून घ्या. ही लिंक ट्विटर युजर्संना मोमेंट्स पेजवरील फॅक्ट चेककडे घेऊन जाते. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अप्रमाणित दाव्यांबाबतच्या बातम्या दिसतात.

दरम्यान, ट्विटरच्या या कारवाईला डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "ट्विटर आता 2020च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही हस्तक्षेप करीत आहे. मेल-इन बॅलेटसंदर्भात माझे विधान भ्रष्टाचार आणि फसवणूक करेल. हे चुकीचे आहे. ही बनावट बातमी सीएनएन आणि अ‍ॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या तथ्य तपासणीवर आधारित आहे."

याचबरोबर, दुसर्‍या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे हल्ला करत आहे. मी राष्ट्रपती म्हणून हे होऊ देणार नाही." दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दिसून आले होते. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना लक्ष्य करत ट्विट केले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका