छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:25 IST2025-06-08T06:24:50+5:302025-06-08T06:25:20+5:30

Turkmenistan News: तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने सांगितले की आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. शांत आणि वाळवंटी भागातील कधीही न विझणाऱ्या या आगीने पर्यटकांना आकर्षित केले होते. 

Turkmenistan: The fire at the 'Gate of Hell', ignited by a small mistake and burning for 45 years, has subsided. | छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

अश्गाबात - तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने सांगितले की आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. शांत आणि वाळवंटी भागातील कधीही न विझणाऱ्या या आगीने पर्यटकांना आकर्षित केले होते. 

‘नरकाचा दरवाजा’ (डोअर टू हेल) या नावाने जगभर प्रसिद्ध असलेला हे विवर प्रत्यक्षात सोव्हिएत अभियंत्यांनी केलेल्या चुकीचा परिणाम आहे. १९७१ मध्ये शास्त्रज्ञ भूमिगत वायूसाठी खोदकाम करत होते. खोदकाम करताना हा खड्डा कोसळला आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडू लागला. या वायू बाहेर पडू नयेत म्हणून तेथे उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनी त्याला आग लावली, जी आजही धगधगत आहे. पण आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या वायूंचा प्रवाह कमी झाल्यामुळे विवरातील आगीच्या ज्वाळा मंदावल्या आहेत.

मिथेनचा सर्वात मोठा उत्सर्जक असल्याचा दावा
जगातील चौथ्या क्रमांकाचा वायू साठा असलेला तुर्कमेनिस्तान या वायू गळतीमुळे मिथेनचा सर्वात मोठा उत्सर्जक बनला. तथापि, तुर्कमेनिस्तानने हा दावा नाकारला आहे.
मिथेनला हवामान बदल आणि ओझोन थराच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण मानले जाते. मिथेन वायू साठवण्यासाठी आणि त्याचा ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी या विवराभोवती अनेक विहिरी देखील खोदण्यात आल्या आहेत. मात्र, हा प्रकल्प यशस्वी झाला नाही. 

३० मीटर खोल आणि ७० मीटर व्यासाचे विवर
हे विवर तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून २६० किलोमीटर अंतरावर असलेल्या काराकुम वाळवंटाच्या मध्यभागी आहे. या विवराचा व्यास ६०-७० मीटर आहे, तर त्याची खोली ३० मीटर असल्याचे सांगितले जाते. 
त्यातून दुर्गंधी येते, परंतु असे असूनही, दरवर्षी लाखो पर्यटक हे नैसर्गिक आश्चर्य पाहण्यासाठी येतात. २०१९ मध्ये, स्थानिक नेते गुरबांगुली बर्दीमुखमेदोव यांनी विवराच्याभोवती कार रॅली आयोजित केली होती. 

Web Title: Turkmenistan: The fire at the 'Gate of Hell', ignited by a small mistake and burning for 45 years, has subsided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.