तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:46 IST2025-11-13T06:45:55+5:302025-11-13T06:46:19+5:30
Turkish military cargo plane crashes: तुर्कीये लष्कराचे सी-१३० हे मालवाहतूक विमान अझरबैजानच्या सीमेनजीक एका गावात कोसळून विमानातील २० कर्मचारी ठार झाले. ही घटना मंगळवारी घडली.

तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
अंकारा - तुर्कीये लष्कराचे सी-१३० हे मालवाहतूक विमान अझरबैजानच्या सीमेनजीक एका गावात कोसळून विमानातील २० कर्मचारी ठार झाले. ही घटना मंगळवारी घडली. या विमानाने अझरबैजानमधील गांझा येथून उड्डाण केले आणि ते तुर्कीयेत येत असताना अझरबैजानच्या सीमेनजीक जॉर्जिया सायनाघी येथे कोसळले.
घटनास्थळी विमानाचे अवशेष इतरत्र पडलेले दिसत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर वैमानिकाने कोणताही धोका असल्याचे संदेश नियंत्रण कक्षाकडे पाठवला नव्हता. पण जेव्हा ते जॉर्जियाच्या भागात पोहचले तेव्हा त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. विमान अपघात नेमका कशाने झाला, याची माहिती मिळू शकली नाही. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. तुर्कीयेच्या मित्र राष्ट्रांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.