ज्याने चेहऱ्यावर फेकलं होतं अॅसिड, तरूणीने त्याच्यासोबतच केलं लग्न; सोशल मीडियावरून टिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:34 IST2021-12-25T17:33:31+5:302021-12-25T17:34:07+5:30
Acid Survivor Love Marriage: याप्रकरणी तरूणाला १३ वर्ष ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कायद्यात बदल झाल्याने तो तुरूंगातून लवकर सुटला.

ज्याने चेहऱ्यावर फेकलं होतं अॅसिड, तरूणीने त्याच्यासोबतच केलं लग्न; सोशल मीडियावरून टिका
तुर्कीमध्ये (Turkey) राहणारी २० वर्षीय एका तरूणीने मोठं मन दाखवत त्या व्यक्तीसोबत लग्न केलं (Acid Survivor Love Marriage) ज्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं होतं. या घटनेनंतर तरूणीला आता केवळ ३० टक्केच दिसतं. या तरूणीवर लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत. लोक म्हणत आहेत की, तिने तसं करायला नको होतं.
तरूणीचं नाव बेरफिन ओजेक आहे. ज्या व्यक्तीसोबत तिने लग्न केलं त्याचं नाव कासिम ओजन सेल्टी आहे. डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कासिमने बेरफिनवर २०१९ मध्ये अॅसिड हल्ला केला होता. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघे वेगळे झाले होते तेव्हा कासिमने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. याप्रकरणी तरूणाला १३ वर्ष ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कायद्यात बदल झाल्याने तो तुरूंगातून लवकर सुटला.
कासिम अॅसिड हल्ला करण्याआधी तरूणीला म्हणाला होता की, 'जर ती त्याची नाही झाली तर दुसऱ्या कुणाची होऊ शकत नाही'. या घटनेनंतर जेव्हा तरूणी शुद्धीवर तेव्हा तिने याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेन्डला शिक्षा मिळाली होती. मात्र, नंतर तिच्या बॉयफ्रेन्ड पश्चाताप झाला आणि तो तिला पुन्हा पुन्हा माफी मागत होता. त्यानंतर बेरफिनने तिची तक्रार मागे घेतली होती.
बेरफिनचे वडील म्हणाले की, त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. आम्ही इतकी वर्ष कायदेशीर लढाई लढली. पण आता सगळं वाया गेलं. या कपलच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.
पण त्यांनी कुणाच्याही टिकेवर उत्तर दिलं नाही. एका यूजरने लिहिलं होतं की, माफी मागितल्याने त्याचा गुन्हा कमी होत नाही. मला तर वाटतं हे लग्न एक-दोन महिन्यात तुटेल. या तरूणीला त्याच तरूणासोबत रहाययंच ज्याने तिच्यासोबत इतकं वाईट केलं.