इस्रायलच्या प्लॅनिंगनं तुर्की संतापला! इराण युद्धात थेट उतरण्याची दिली धमकी, अमेरिकाही सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:18 IST2026-03-30T19:16:24+5:302026-03-30T19:18:38+5:30

खरे तर इस्रायलचे सीरिया, इराक आणि इराणमधील कुर्द संघटनांशी दीर्घकाळापासून सुरक्षा, लष्करी आणि गुप्तचर संबंध आहेत.

Turkey angered by Israel planning! Iran threatens to enter war directly, America is also cautious | इस्रायलच्या प्लॅनिंगनं तुर्की संतापला! इराण युद्धात थेट उतरण्याची दिली धमकी, अमेरिकाही सावध

इस्रायलच्या प्लॅनिंगनं तुर्की संतापला! इराण युद्धात थेट उतरण्याची दिली धमकी, अमेरिकाही सावध

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात तुर्कीने मोठे संकेत दिले आहेत. जर कुर्दिश बंडखोर इराणविरुद्धच्या जमिनीवरील लढाईत सामील झाले तर जसं आम्ही यापूर्वी सीरियामध्ये केले होते त्याचप्रमाणे उत्तर इराकमध्ये सैन्य कारवाई सुरू करू शकतो असं तुर्कीने म्हटलं. हा इशारा विशेषतः कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) आणि त्यांचा इराणी मित्रपक्ष कुर्दिस्तान फ्री लाइफ पार्टी (PJAK) यांना देण्यात आला आहे. या संघटना इस्रायलच्या पाठिंब्याने इराणच्या पश्चिम भागातील लढाईत सामील होऊ शकतात असा तुर्कीला संशय आहे.

सूत्रांनुसार २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांपासून तुर्की या संघर्षात कुर्दिश बंडखोरांबाबत वारंवार इशारा देत आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलताना तुर्की कोणत्याही दहशतवादी संघटनेचा वापर स्वीकारणार नाही आणि सर्व देशांनी एकमेकांच्या सीमा व प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे असं स्पष्टपणे सांगितले.

तुर्कीचा कुर्दांना इशारा

तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि गुप्तचर संस्थांनी इराकच्या कुर्दबहुल प्रदेशातील अधिकाऱ्यांना कळवले आहे की, जर परिस्थिती आणखी बिघडली तर तुर्की तिथेही लष्करी कारवाई करेल. तुरुंगात असलेल्या पीकेके नेते अब्दुल्ला ओकलान यानेही आपल्या संघटनेला इस्रायलच्या जाळ्यात न अडकण्याचा इशारा दिला आहे. या वक्तव्याचा परिस्थितीवर प्रभाव पडल्याचे मानले जाते. खरे तर इस्रायलचे सीरिया, इराक आणि इराणमधील कुर्द संघटनांशी दीर्घकाळापासून सुरक्षा, लष्करी आणि गुप्तचर संबंध आहेत.

युद्धात कुर्दांना का समाविष्ट करतंय इस्रायल?

इराणवर आक्रमण करण्यासाठी उत्तर इराकमधील कुर्दिश बंडखोरांचा वापर करण्याचं इस्रायलचं प्लॅनिंग होते. मात्र अमेरिकेने यातून माघार घेतली. कारण अमेरिकेला कुर्दांना या संघर्षात सामील करून घ्यायचे नाही असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. अमेरिकेची ही भूमिका तुर्कीसोबतच्या त्यांच्या संबंधांशी देखील जोडलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली असे म्हणत त्यांची प्रशंसा केली. एर्दोगान यांनीही ट्रम्प यांना एक महान नेता म्हटले. तुर्की आणि नाटो यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या युगाची ही सुरुवात आहे. नाटोने तुर्कीच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे रोखली आणि आपली हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत केली. जर तुर्कीवर हल्ला झाला तर नाटो सर्वप्रथम प्रत्युत्तर देईल. युद्धाची पुढील तीव्रता टाळण्यासाठी तुर्कीने इस्रायलसोबत थेट संघर्ष टाळावा अशी अमेरिकेची इच्छा आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं. 

Web Title : इजराइल-ईरान संघर्ष के बीच तुर्की की सैन्य कार्रवाई की चेतावनी

Web Summary : तुर्की ने संभावित इजराइल-ईरान संघर्ष में कुर्दिश भागीदारी के खिलाफ चेतावनी दी है, इराक में सैन्य कार्रवाई की धमकी दी है। तुर्की को संदेह है कि इजराइल समर्थित कुर्द समूह ईरान में लड़ाई में शामिल हो सकते हैं। अमेरिका तनाव कम करने की कोशिश कर रहा है, तुर्की से इजराइल के साथ सीधे संघर्ष से बचने का आग्रह कर रहा है।

Web Title : Turkey Warns of Military Action Amidst Israel-Iran Conflict Concerns

Web Summary : Turkey warns against Kurdish involvement in a potential Israel-Iran conflict, threatening military action in Iraq. Turkey suspects Kurdish groups, backed by Israel, might join fighting in Iran. The US seeks to de-escalate tensions, urging Turkey to avoid direct conflict with Israel.